Rahu Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांना अतिशय महत्त्व असून शनि, राहू आणि केतू यांचं नाव घेतलं तरी आपल्याला भीती वाटते. शनिदेव हा आपल्याला कर्माचं फळ देतो. तुमचं कर्म चांगल असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. पण तुमचे कर्म वाईट असेल तर शनिदेव तुम्हाला शिक्षा देतो. तर मायावी ग्रह राहु आणि केतू हे वाईट ग्रहांमध्यो मोडले जाता. त्यामुळे जेव्हा हे ग्रह हालचाल करतात तेव्हा याचा परिणाम सर्व राशींवर होतो. काहीसाठी तो शुभही ठरतो. या वर्षातील 30 ऑक्टोबरपासून राहु मीन राशीत विराजमान आहे. तो आता मार्च 2025 पर्यंत मीन राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील दीड वर्ष तीन राशींसाठी वादळाची ठरणार आहे. (Rahu Gochar Due to the elusive Rahu transit financial crisis on these zodiac signs people Multiple storms in succession by 2025) 


'या' राशींसाठी येणारी 2 वर्ष संकटांची!


तूळ रास (Libra Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांना पुढील दीड वर्ष कठीण असणार आहे. या लोकांना त्यांच्या कामात विशेष लक्ष द्यावे लागणार असून त्यांना सतर्क राहावे लागणार आहे. या काळात त्यांनी कोणाकडूनही पैसे उसणे घेऊ नयेत. जर तुम्हाला कर्ज घेण्याची गरजच असेल तर परतफेड कशी करणार याची भक्कम तयारीशिवाय ते घेऊ नका. नाही तर तुम्ही भविष्यात संकटात सापडतील. 


वृश्चिक रास (Scorpio Zodiac)


वृश्चिक राशीच्या लोकांना राहु गोचरमुळे अधिक सावधगिरीने राहावं लागणार आहे. खास करुन व्यावसायिकांना या काळात आर्थिक व्यवहार करताना काळजी घेण्याची गरज आहे. नाही तर या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला सर्व बाजून तपासून शिवाय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काम करणं तुमच्यसाठी हिताच ठरेल. 


धनु रास (Sagittarius Zodiac)


या राशीच्या लोकांना व्यावसायासोबतच कुटुंबासाठी वेळ काढणं कठीण जाणार आहे. राहु गोचरमुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात वादळ येणार आहे. व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी नेटवर्किंगवर भर दिला तर त्यांच्यासाठी फायद्याचं होईल अन्यथा त्रासदायक ठरेल. मालमत्ता किंवा जमीन खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबी तपासून घ्या अन्यथा फसवणुकीचा धोका आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)