Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला छायाग्रह संबोधलं गेलं आहे. राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. मात्र राहु शनिसारखं आणि केतु मंगळसारखं फळ देतो, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रातील सूत्रानुसार कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल राहुचा प्रभाव कमी असतो. दुसरीकडे गुरुबळ असल्यास केतूचा प्रभाव चालत नाही. राहु-केतु ज्या राशीत विराजमान असतात, त्या राशीच्या स्वामीनुसार फळ देतात. यासाठी राहु आणि केतुला मायावी ग्रह संबोधलं जातं. राहु आणि केतु एका राशीत दीड वर्षासाठी ठाण मांडतात आणि उलट दिशेने प्रवास करतात. आता 30 ऑक्टोबर 2023 रोजी हे दोन्ही ग्रह गोचर करणार आहेत. राहु मीन राशीत, तर केतु कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या गोचर स्थितीमुळे तीन राशींना फायदा होणार आहे, चला जाणून घेऊयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- राहु ग्रहाचा गोचर या राशीतील लाभ स्थानात होणार आहे. अकराव्या स्थानातील गोचर फलदायी मानला जातो. या स्थितीमुळे भाऊ आणि मित्राची साथ मिळेल. या काळात एखादा बिझनेस सेट होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे चांगला फायदा होऊ शकतो. या काळात कुटुंबाची चांगली साथ मिळेल. 


तूळ- या राशीच्या सहाव्या स्थानात राहुचं गोचर होणार आहे. हे स्थान आजार, कर्ज, शत्रू आणि नोकरीशी निगडीत आहे. राहुची नजर दहाव्या, बाराव्या आणि दुसऱ्या स्थानावर असेल. राहुचं गोचर या राशींसाठी लाभदायी ठरेल. नोकरीची चांगली संधी मिळेल. विदेशात जाण्याचं स्वप्न या काळात पूर्ण होईल.


बातमी वाचा- शुभ मंगल सावधान...! 2023 या वर्षात इतके शुभ मुहूर्त, जाणून घ्या तिथी आणि तयारीला लागा


मकर- या राशीच्या तिसऱ्या स्थानात राहुचं गोचर होणार आहे. हे स्थान भाऊ-बहीण, पराक्रम, साहस या बाबत निगडीत आहे. राहु या स्थानातून सप्तम, नवम आणि एकादश भावावर नजर ठेवेल. यामुळे या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मीडिया, लेखन क्षेत्रातील लोकांना फायदा होईल. जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)