शुभ मंगल सावधान...! 2023 या वर्षात इतके शुभ मुहूर्त, जाणून घ्या तिथी आणि तयारीला लागा

Marriage Shubh Muhurta 2023: नवं सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवं वर्षात काय करावं आणि काय करु नये यासाठी योजना आखल्या जात आहेत. तसेच शुभ मुहूर्त शोधून लग्न करण्याचा काही जणांचा प्लान आहे. हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचा असतो.

Updated: Dec 2, 2022, 06:04 PM IST
शुभ मंगल सावधान...! 2023 या वर्षात इतके शुभ मुहूर्त, जाणून घ्या तिथी आणि तयारीला लागा

Marriage Shubh Muhurta 2023: नवं सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नवं वर्षात काय करावं आणि काय करु नये यासाठी योजना आखल्या जात आहेत. तसेच शुभ मुहूर्त शोधून लग्न करण्याचा काही जणांचा प्लान आहे. हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचा असतो. कुंडली पाहून शुभ मुहूर्त काढला जातो. मुहूर्त न पाहता लग्न केल्यास भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. म्हणून भविष्यात कोणतीही अडचण नको म्हणून लोकं मुहूर्त पाहून लग्न करतात. मात्र विवाह मुहूर्ताबाबत अनेकांना माहिती नसते. त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही लग्न (Marriage) करण्याच्या विचारात असाल तर शुभ मुहूर्ताबाबत जाणून घ्या. कोणत्या महिन्यात किती मुहूर्त आहेत जाणून आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार वर्षात असे चार दिवस आहेत. त्या दिवशी मुहूर्त न पाहाताही लग्न किंवा धार्मिक विधी करता येतो. यात अक्षय्य तृतीया, देवउठनी एकादशी, वसंत पंचमी आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील भडली नवमी यांचा समावेश आहे. दुसरीकडे विवाहासारख्या शुभ कार्यासाठी शुक्र ग्रह उदय स्थितीत असणं आवश्यक आहे. येणाऱ्या नव वर्षात एकूण 59 शुभ मुहूर्त आहेत. हे शुभ मुहूर्त जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आहेत. 2023 या वर्षातील जानेवारी महिन्यात 9, फेब्रुवारी महिन्यात 13, मे महिन्यात 14, जून महिन्यात 11, नोव्हेंबर महिन्यात 5 आणि डिसेंबर महिन्यात 7 शुभ मुहूर्त आहेत. 

बातमी वाचा- Mokshada Ekadashi 2022: मोक्षदा एकादशीला शुभ योग, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

शुभ मुहूर्त असलेल्या तारखा

  • जानेवारी- 15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30 आणि 31 तारीख
  • फेब्रुवारी-  6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22, 23 आणि 28 तारीख
  • मे- 4, 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29 आणि 30 तारीख
  • जून- 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26 आणि 27 तारीख
  • नोव्हेंबर- 23, 24, 27, 28 आणि 29 तारीख
  • डिसेंबर- 5, 6, 7 8, 9, 11 आणि 15 तारीख

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)