Guru Chandal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील ग्रहांची स्थिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे जाचकाच्या आयुष्यावर परिणाम होतो. कुंडलीतील ग्रहांची शुभ स्थिती चांगले परिणाम देतात. तर अशुभ स्थिती ही नकारात्मक गोष्टी घडवितात. (rahu guru yuti making Guru Chandal Yog bad effect Horoscope and upay Astrology news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रामध्ये असाच एक विनाशकारी योग म्हणजे गुरु चांडाळ योग. हा योग कालसर्प दोषापेक्षाही घातक आहे. या गुरु चांडाळ योगामुळे जाचकाच्या आयुष्यात भूकंप येतो. या योगामुळे जाचकाचे चारित्र्य, शिक्षण आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतोना दिसतात. 


जन्म तारखेनुसार मेष, वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांवर गुरु चांडाळ योगाचा सर्वाधिक घातक परिणाम दिसून येतो. जेव्हा गुरु बृहस्पति राहू केतूशी जोडतो तेव्हा हा अशुभ गुरु चांडाळ योग निर्माण होतो. गुरु चांडाळ योग कुंडलीमधील पाचव्या, सातव्या, नवव्या आणि दहाव्या घराचा स्वामीत चांडाळ योग निमार्ण होतो. गुरु चांडाळ योग हा 22 एप्रिल 2023 पासून 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. 


गुरु चांडाळ योगाचा प्रभाव 


या विनाशकारकी योगामुळे व्यक्तीच्या मान सन्मानाला हानी पोहोचते. त्यांचा चारित्र्यावर वाईट परिणाम दिसून येतो. करिअर आणि व्यवसायात मोठं नुकसान होतं. 


जाचक चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत अडकतात. अगदी जुगार आणि ड्रग्जचं व्यसन त्यांना विनाशाकडे घेऊन जाते. जीवनात सुख, शाती आणि समृद्धी नष्ट होते. धनहानीसोबत मानसिक समस्या उद्भवतात. 



गुरु चांडाळ योगाने शांती कशी करावी?


गुरु चांडाळ योगाचा परिणाम कमी करण्यासाठी वैदिक ज्योतिषशास्त्रात उपाय आणि मंत्रांचा जप सांगितला आहे. तुम्ही गायीला चारा खाऊ घाला. त्यानंतर हनुमानजींची पूजा करा. त्याशिवाय भगवान शिवाची पूजा आणि अभिषेक तुम्हाला फायदेशीर होईल. 


केळीच्या झाडाची पूजा करुन हळद आणि चंदनाचा तिलक लावा. कोणत्याही दोषातून मुक्त होण्यासाठी भगवंताची पूजा अर्चा करा. राहू-गुरू मंत्राचा जप करा आणि आपल्या क्षमतेनुसार दान धर्म करा. 


हेसुद्धा वाचा - कुंडलीत Shani - Mangal ची शुभ स्थिती असले तर क्षणात तुम्ही व्हाल श्रीमंत


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)