Saturn Retrograde 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात येणारा शनिवार 17 जून ग्रहांच्या दृष्टीकोनातून अतिशय खास आहे. यादिवशी शनिदेवासह राहू आणि केतू प्रतिगामी गती होणार आहे. तब्बल 30 वर्षांनी शनिदेव आपल्या मूळ राशीत म्हणजे कुंभ राशीत वक्री करणार आहे. शनिदेव 17 जून रोजी रात्री 10.56 वाजता कुंभ वक्री होणार आहे. तर राहु मेष राशीत आणि केतू तूळ राशीमध्ये प्रतिगामी होणार आहे. शनी, राहू आणि केतू 6 महिने उलट फिरतील. त्यामुळे 4 राशींच्या आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. (rahu ketu shani vakri 2023 saturn retrograde negative impacts 4 zodiac signs money problems shani vakri 2023 )


'या' राशींनी राहवं सावधान!


कर्क (Cancer)


शनिसोबत राहु केतूच्या वक्रीस्थितीमुळे या राशीच्या लोकांना खास करुन आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आर्थिक संकट कोसळणार आहे. तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते फेडण्यासाठी तुमच्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात वादळ येणार आहे. 


सिंह (Leo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनी, राहू आणि केतूच्या बदलामुळे या राशीच्या लोकांना कितीही मेहनत केली तरी त्याचं फळ मिळणार नाही. कामाच्या ठिकाणी संकट वाढणार आहे. नोकरी सोडण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तुमची मानसिक शांती भंग होण्याची शक्यता आहे. या काळात कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कायदेशीर किंवा तांत्रिक अडचणीमध्ये तुम्ही सापडण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकतं. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांना पुढील 6 महिने खूप अडचणीचे जाणार आहे. करिअर आणि व्यवसायात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. आरोग्याची समस्या उद्धभवणार आहे. आर्थिक गणित बिघडणार आहे. कर्ज मागण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. भागीदारीत व्यवसाय असेल तर वादात होण्याची शक्यता आहे. योग्य कागदपत्रांशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार चूकनही करु नका. नाहीतर मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.  नात्यांमध्ये तणाव जाणवेल. 


मीन (Pisces)


या राशीच्या लोकांच्या जीवनात पुढील 6 महिन्यात त्यांना मानसिक आणि आर्थिक समस्येतून जावं लागणार आहे. तुमच्या वागण्यात बदल दिसून येणार असून नकारात्मक गोष्टींचा प्रभाव दिसणार आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबातील वातावरण खराब होईल. वाद आणि भांडण होण्याची दाट शक्यता आहे.  आरोग्याच्या समस्येसाठी अधिक पैसा खर्च होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)