Rahu-Mangal Yuti: 18 वर्षांनंतर जवळ येणार राहू-मंगळ; `या` राशींना येणार सोन्यासारखे दिवस
Rahu And Mangal Ki Yuti: एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे.
Rahu And Mangal Ki Yuti: एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याला ग्रहांचं गोचर म्हटलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचरमुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग बनतो. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देशावर आणि जगावर दिसून येतो.
एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. तब्बल 18 वर्षांनंतर हे संयोजन तयार होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. मंगळ आणि राहूच्या युतीमुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे, ते पाहूया.
वृषभ रास (Taurus Zodiac)
मंगळ आणि राहूचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरणाबद्दल बोलले तर कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच व्यवसायात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या बौद्धिक कौशल्याने इतरांना प्रभावित कराल.
कर्क रास (Cancer Zodiac)
मंगळ आणि राहूची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा मोठ्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात नफा मिळू शकणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
मंगळ आणि राहूची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगतीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )