Rahu Nakshatra Gochar 2022: १४ जूनला राहु ग्रह करणार नक्षत्र परिवर्तन, `या` राशींसाठी अच्छे दिन
ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रह, गोचर आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं.
मुंबई: ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ग्रह, गोचर आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. नऊ ग्रहांपैकी राहु ग्रहाला पापग्रह म्हणून संबोधलं जातं. राहु-केतु या ग्रहांना छाया ग्रहही बोललं जातं. या ग्रहांची वक्री दृष्टी पडली तर, अडचणीत वाढ होते. राहु ग्रहाने मेष राशीत गोचर केल्यानंतर आता 14 जूनला नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या राहु ग्रह मेष राशी आणि कृत्तिका नक्षत्रात आहे. राहु 8 दिवसानंतर भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहु या नक्षत्रात 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत राहील.
भरणी नक्षत्र
भरणी नक्षत्रात जन्माला आलेल्या लोकांची राशी मेष असते. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. अशात या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर मंगळ आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. यामुळे या राशीचे लोक साहसी, निर्भय, सुखाचा ध्यास घेणारे, दिलेलं वचन पाळणारे आणि आकर्षक असतात.
राहु ग्रहाने भरणी नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर 8 महिने या राशीत असणार आहे. या बदल तीन राशींसाठी शुभ मानला जात आहे. जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
मेष: राहुचं नक्षत्र परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात करिअर आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पदोन्नती आणि कामाचं कौतुक होईल. उत्पन्नात वाढ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचा योग आहे.
वृषभ: या राशीच्या लोकांसाठी हा काळ भरभराटीचा राहील. या काळात उत्पन्नात वाढ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील.
तूळ: तूळ राशीला या काळात मानसिक समाधान मिळेल. त्याचबरोबर या परिवर्तनामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात प्रवासाचे योग जुळून येतील.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )