Rahu-Shukra Yuti: 10 वर्षानंतर राहु-शुक्राची होणार युती; `या` राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ
Rahu And Shukra Conjunction In Meen: मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग तयार होणार आहे. हा संयोग 12 वर्षांनी तयार होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
Rahu And Shukra Conjunction In Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या गोचरमुळे त्यांचा इतर ग्रहांशी संयोग होतो. यावेळी ग्रहांची युती निर्माण होऊन त्याचा मानवी जीवनावर परिणाम होताना दिसतो. यासोबतच मार्चच्या सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.
यावेळी मीन राशीमध्ये राहू आणि शुक्राचा संयोग तयार होणार आहे. हा संयोग 12 वर्षांनी तयार होणार असून त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
वृषभ रास (Taurus Zodiac)
राहू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकता. तुमची आर्थिक बाजूही खूप मजबूत असेल. या काळात तुमची बचतही वाढू शकते.तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. मोठे व्यावसायिक करार करू शकतात.
धनु रास (Dhanu Zodiac)
तूळ राशीच्या लोकांसाठी राहू आणि शुक्राची जोडी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही तुमचे पालक किंवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत लाभ मिळवू शकता. तुमच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप फलदायी असणार आहे. ज्यांचा व्यवसाय मालमत्ता, रिअल इस्टेट आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता.
मिथुन रास (Mithun Zodiac)
राहू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमच्यापैकी जे लोक या काळात तुमची नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)