Rahu Transit 2023 effects : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहु आणि केतू छाया ग्रह असून ते क्रूर आणि पापी ग्रह म्हणून ओळखले जातात. कुंडलीतील राहू किंवा केतूची स्थिती अशुभ असल्यास जाचकाच्या आयुष्यात भूकंप येतो. त्यांना लोकांना प्रत्येक गोष्टीत त्रास सहन करावा लागतो. पण तु्म्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, राहु शुभ फळही देतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहु आणि केतू हे ग्रह नेहमी मागे फिरतात आणि दीड वर्षात आपली रास बदलतात. या वर्षी 30 ऑक्टोबरला राहू मेष राशीतून मीन राशीत गोचर करणार आहे. राहु संक्रमणाचा 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होता. मात्र 3 राशीच्या लोकांसाठी राहू गोचर वरदान ठरणार आहे. श्रीमंत, प्रगती आणि यश घेऊन आला आहे. (rahu transit in pisces 2023 money will rain on the people of these 3 zodiac signs rahu gochar)


'या' राशींसाठी राहु ठरणार वरदान!


वृषभ (Taurus Zodiac) 


राहुचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभदायक ठरणार आहे. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात शुभदायी परिणाम दिसणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्न वाढणार आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपुष्टात येणार आहे. तुमच्या योजना पूर्ण होणार आहे. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. राजकारणात सक्रिय लोकांना मोठे यश मिळणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)  


राहुच्या राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. अचानक मिळालेले धन आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. उच्च पदावरील लोकांशी संपर्क होणार आहे. लोकांशी संबंध सुधारणार आहेत. चांगला जीवनसाथीची एन्ट्री होणार आहे. प्रत्येक काम चांगल होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)


राहुचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत तुमची स्थिती मजबूत होणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व चमकणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या डोक्यातून कर्जाचे बोजे उतरणार आहे. तुमचे आरोग्य सुधारणार आहे. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होणार आहे.


हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 11 ते 17 सप्टेंबर : सूर्य आणि बुधामुळे या राशींच्या दारी येईल लक्ष्मी! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)