Raj Yoga in July 2022: 30 वर्षानंतर दुर्मिळ ग्रहयोग! 4 राशींना मिळणार लाभ
ग्रहांच्या युतीचा राशींवर प्रभाव पडतो. जुलै 2022 मध्ये ग्रहांची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरेल.
Budh-Shukra Yuti: ग्रहांच्या युतीचा राशींवर प्रभाव पडतो. जुलै 2022 मध्ये ग्रहांची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरेल. शुक्राच्या वृषभ राशीत बुध-शुक्र एकत्र येत आहेत. 30 वर्षांनंतर न्यायदेवता शनि मूळ त्रिकोण राशीमध्ये, कुंभ राशीत उपस्थित आहे. शनि आणि बुध-शुक्र यांची ही स्थिती 4 राशींमध्ये शश, मालव्य असे राजयोग बनवत आहे. हे योग या राशींना लाभदायी ठरतील. चला जाणून भाग्यशाली राशींबद्दल
राजयोग
वृषभ- ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीच्या लग्नभावात राजयोग तयार होत आहे. हा योग त्यांच्या करिअरची दिशा बदलू शकतो. मोठे पद मिळू शकते. तुम्हाला मोठ्या पगार आणि पदासह नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ यशाचा असेल. तसेच हा काळ वृषभ राशीच्या लोकांचा मान-सन्मान वाढवेल.
सिंह- बुध-शुक्र, शनीची स्थिती सिंह राशीमध्ये दोन राजयोग तयार करत आहे. या राशीच्या लोकांना हा योग अचानक खूप पैसा मिळवून देईल. भागीदारीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. या काळात केलेली गुंतवणूक मोठा नफा देईल. मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकेल.
वृश्चिक- ग्रहांची स्थिती वृश्चिक राशीच्या लोकांच्या करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठे बदल घडवून आणेल. नवीन नोकरी, वेतनवाढ मिळू शकते. जे लोक दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्यांना मोठा लाभ मिळेल. नवीन घर-कार खरेदी करू शकता.
कुंभ- कुंभ राशीत तयार होणारे दोन राजयोग या राशीच्या लोकांचे जीवन सुखकर बनवतील. लक्झरी लाइफ एन्जॉय करतील. तुम्ही कार खरेदी करू शकता. घरात काही शुभ कार्य होऊ शकतात किंवा तुम्ही सहलीला जाऊ शकता. नवीन मार्गाने उत्पन्न वाढेल. कामात नशीब तुमची साथ देईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS ने मान्यता दिली नाही.)