Dhanteras 2023 : दिवाळी जवळ आलीये आणि आता अनेकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र पुष्य नक्षत्रात तुमची कोणतीही खरेदी चुकली असेल, तर पुढील सात दिवसांत 14 मोठी शुभ योग निर्माण होणार आहेत. यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. 6 ते 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीपर्यंत दररोज शुभ योग येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्वांमध्ये सर्वात शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला असणार आहे. या दिवशी 4 राजयोग आणि एक शुभ योग तयार होत आहे. 10 नोव्हेंबरला 5 योग होणार आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. 


जाणून घेऊया कोणते शुभ तयार होणार आहेत


या योगांमध्ये शुक्ल, ब्रह्मा, इंद्र, स्थिर, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, दामिनी, उभयचारी, वरीषण, सरल, शुभकार्तरी गजकेसरी आणि सर्वार्थसिद्धी योगाचा समावेश आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, या शुभ योगांमध्ये केलेली खरेदी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरणार आहे. 


6 नोव्हेंबर- शुक्ल आणि गजकेसरी योग


या शुभ काळात मिठाई, मोत्याचे दागिने, सुगंधी वस्तू, मत्स्यालय किंवा पाण्याशी संबंधित सजावटीच्या वस्तू खरेदी करता येतात.


7 नोव्हेंबर- ब्रह्म आणि शुभकर्तरी योग


या दिवशी शुभ योग तयार होत असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणं शुभ राहणार आहे. प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीही हा दिवस खास असेल.


8 नोव्हेंबर- इंद्र, दामिनी आणि स्थिर योग


या दिवशी तयार होणार्‍या तीन शुभ योगांमध्ये दागिने, कपडे आणि स्टेशनरी खरेदी करणं शुभ राहणार आहे. तसंच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही हा दिवस खास असेल.


9 नोव्हेंबर- शुभकर्तरी आणि उभयचरी योग


फर्निचर, यंत्रसामग्री आणि वाहन खरेदीसाठी हा दिवस शुभ राहणार आहे. कारण या दिवशी दोन राजयोग तयार होत आहेत. या शुभ योगांमुळे नवीन काम सुरू करण्यासाठीही दिवस चांगला राहील.


10 नोव्हेंबर- शुभकर्तरी, वरिष्ठ, सरल, सुमुख और अमृत योग


या दिवशी धनत्रयोदशी असल्याने दागिने, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सर्व प्रकारची खरेदी करता येऊ शकते. 5 शुभ योग तयार झाल्यामुळे नवीन सुरुवात करण्यासाठी देखील हा दिवस महत्वाचा असणार आहे.


11 नोव्हेंबर- प्रीती आणि सर्वार्थसिद्धि योग


या शुभ योगांमध्ये केलेले काम यशस्वी मानण्यात येतं. यावेळी वाहन आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी किंवा कारखाना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. 


12 नोव्हेंबर- आयुष्मान आणि सौभाग्य योग


हा लक्ष्मी सण असल्याने या दिवशी कोणत्याही प्रकारची नवीन सुरुवात, खरेदी, गुंतवणूक आणि व्यवहार करणे खूप शुभ राहणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )