Rajbhang Rajyog: मिथुन राशीत बनणार ‘राजभंग योग’, `या` राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Rajbhang Rajyog 2024: मिथुन राशीमध्ये मंगळ सातव्या भावात स्थित आहे. अशा स्थितीत मंगळावर शनी आणि राहू या दोघांची नववी राशी येत आहे. यामुळे खास राजभंग नावाचा राजयोग तयार झाला आहे.
Rajbhang Rajyog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येर ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांचा सेनापती मंगळ त्याच्या निश्चित काळानंतर राशी बदलतो. सध्या मंगळ धनु राशीत आहे. अशातच जर शनीची दृष्टी मंगळापासून दूर गेली असेल तर ती प्रत्येक राशीमध्ये शुभ परिणाम देणार आहे.
मिथुन राशीमध्ये मंगळ सातव्या भावात स्थित आहे. अशा स्थितीत मंगळावर शनी आणि राहू या दोघांची नववी राशी येत आहे. यामुळे खास राजभंग नावाचा राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राजभंग योग तयार झाल्याने काही राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया राजभंग योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना लाभ मिळू शकणार आहेत.
मिथुन रास (Mithun Zodiac)
या राशीमध्ये मंगळ सातव्या भावात स्थित असून या राशीत राजभंग देखील होणार आहे. अशा स्थितीत या राशीला लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कायदेशीर बाबींमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. राजभंग योग तयार झाल्याने काही काळापासून कामाच्या ठिकाणी आलेले अडथळे आता दूर होतील. तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठीही राजभंग योग लाभदायक ठरणार आहे. या काळात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा सुरू होतील. तुम्ही व्यवसायात सतत होणाऱ्या तोट्यापासून मुक्त होऊ शकता. तुम्हाला कुटुंबियांचा पाठिंबा मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. नव्या उमेदीने आणि विचाराने पुढे जाणार आहे.
कर्क रास (Kark Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी राजभंग योगाची निर्मिती विशेषतः फायदेशीर ठरू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नोकरी सुरू करू शकता. तुमची परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार आहे. नफ्यासोबत आर्थिक लाभही होण्याची दाट शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)