Rajyog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह हालचाल करतात त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. येणारं नवीन वर्ष हे ग्रह गोचरच्या दृष्टिकोनातून अतिशय खास आहे. आगामी वर्षात 2024 मध्ये अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहे. त्यातून अनेक शुभ आणि अशुभ योगांची निर्मिती होणार आहे. तब्बल 1100 वर्षांनंतर गुरुसोबत दोन अशुभ ग्रहांचं मिलन होणार आहे. नवीन वर्षात गुरु सोबत शनि आणि राहु यांचा दुर्मिळ संयोग निर्माण होणार आहे. गुरु हा ज्ञान, संपत्ती, शिक्षण, धार्मिक कार्य, संतती, संपत्ती, विवाह इत्यादींचा कारक मानला जातो. शनि आणि राहू हे दोन्ही अशुभ ग्रह असून  दोन्ही ग्रहांची वाईट दृष्टी राजालाही कंगाल करते. (Rajyog 2024 Rare conjunction of 2 inauspicious planets with Jupiter after 1100 years shani rahu guru yuti these zodiac signs get money)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 मध्ये राहू संपूर्ण वर्ष गुरूच्या राशीत मीन राशीत विराजमान असणार आहे. त्याच वेळी, शनी देखील मूळ त्रिकोण कुंभ राशीत असेल आणि वेळोवेळी त्याची हालचाल बदलणार आहे. देव गुरु बृहस्पति मे 2024 पर्यंत मेष राशीत राहणार आहे. यानंतर ते वृषभ राशीत गोचर करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तीन ग्रहांचा असा संयोगाने तीन राशींसाठी वरदान ठरणार आहे. 


मेष (Aries Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठीही ग्रहांची ही जोडी चांगली ठरणार आहे. त्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ होणार आहे. पद आणि प्रतिष्ठेत फायदा होणार आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे. कुटुंबात समृद्धी येणार असल्याने आनंदाच वातावरण असणार आहे. अविवाहित लोकांना विवाहाचा प्रस्ताव येणार आहे. व्यवसायिकांसाठी हा संयोग फायदेशीर असणार आहे. त्यांना 30 ऑक्टोबरपर्यंत मोठा आर्थिक लाभ होणार आहे. 


कुंभ  (Aquarius Zodiac) 


या राशीच्या लोकांना पुढील वर्षी विशेष लाभदायक ठरणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. तीन ग्रहांच्या संयोगामुळे तब्येतीत सुधारणार होणार आहे. जुन्या आजारातून आराम मिळणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आनंद देणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी आनंद असणार आहे. विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. पदोन्नतीचे योगही या त्रिग्रहामुळे जुळून आला आहे.  


मीन (Pisces Zodiac)


या राशीच्या लोकांना राहु आणि गुरूचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे. यश आणि आर्थिक लाभ दुप्पटीने मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होणार आहे. परदेश दौऱ्याचे नियोजन तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. आत्मविश्वास आणि धैर्यात वाढ होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)