Raksha Bandhan 2023 : 700 वर्षांनंतर पंचमहायोग! 30 की, 31 ऑगस्ट भावाला राखी कधी बांधायची? पंचांगकर्ते दा. कृ. सोमणांची माहिती
Raksha Bandhan 2023 : यंदा भद्राचं सावट आल्यामुळे रक्षाबंधन 30 की, 31 ऑगस्ट कधी आहे याबद्दल संभ्रम आहे. अशात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Raksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो. भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचा हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा असे वेगवेगळ्या नावाने ही ओळखली जाते. यंदा अधिक महिना आल्यामुळे सणवार पुढे गेले आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून प्रत्येकाला ओढ लागली आहे, ती भावा बहीणच्या प्रेमळ नात्याचा उत्सवाची.(rakhi purnima 2023 date 30 or 31st august shubh muhurat Bhadrakali time on rakhi and raksha bandhan 2023 panch mahayog)
पण यंदा रक्षाबंधनावर भद्राचं सावट आल्यामुळे 30 आणि 31 ऑगस्ट कुठल्या दिवशी भावाला राखी बांधली तर चालणार आहे. राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कधी आहे, त्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. यंदा तब्बल 700 वर्षांनी रक्षाबंधनाला पंचमहायोग जुळून आला आहे.
पंचांगानुसार श्रावणी पौर्णिमा ही 30 ऑगस्ट बुधवारी सकाळी 10.58 वाजेपासून 31 ऑगस्ट 7.05 वाजेपर्यंत असणार आहे. तर 30 ऑगस्टला सकाळी 10.58 पासून रात्री 9.01 वाजेपर्यंत भद्राची सावली आहे. भद्रकालमध्ये शुभ काम केले जात नाही. यामुळे भद्रकालात राखी बांधणे अशुभ आहे, असतं असं मॅसेज व्हायरल होतं आहे.
अशात पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं की देशभरात 30 ऑगस्ट बुधवारी भावा बहीणच्या प्रेमाचा सण साजरा करण्यात येणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे केले जातात. शिवाय शास्त्रनियमाप्रमाणे सूर्योदयापासून 6 घटिकांपेक्षा जास्त व्यापिणी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करायची आहे, असं सोमण यांनी सांगितलं आहे. शिवाय रक्षाबंधन हा धार्मिक विधी नाही, तर हा भावाबहीण नातं वाढणाचा सण आहे त्यामुळे रक्षाबंधन बुधवारी तुम्ही पूर्ण दिवस साजरा करु शकता, असं दा. कृ. सोमण आणि आनंद पिपंळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठी का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, पाहा काय सांगते ज्योतिषविद्या
तरीदेखील तुम्हाला असं वाटतं की नकोच तर रात्री 9.01 नंतर तुम्ही भावाला राखी बांधू शकता. त्याशिवाय 31 ऑगस्ट 2023 ला राखी बांधणे शुभ राहील. 31 ऑगस्टला सकाळी 07.05 पर्यंत तुम्ही राखी बांधू शकता.