Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचं प्रतीक आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला भावा बहिणीच्या नात्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधते. आज रक्षाबंधनावर भद्राची सावली असल्याने लोकांच्या मनात संभ्रम आहे. ते गैरसमज दूर करुयात. (raksha bandhan 2023 rakhi tied shubh muhurat bhadra kaal astro and rakhi according zodiac sign and Rakshabandhan Rules In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 11:00:27 वाजेपासून 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजेपर्यंत असणार आहे. पण दुसरीकडे भद्राकाल देखील सकाळी 10:58 पासून सुरू होणार असून तो रात्री 09:02 पर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार भद्रकाळात चांगली काम करायची नसतात. त्यामुळे भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. अशा स्थितीत तुम्ही रात्री 09:03 ते 31 ऑगस्टच्या सकाळी 7:05 पर्यंत राखी बांधू शकता. 


हेसुद्धा वाचा - Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला 'या' 5 पैकी एकही वस्तू घरी आणा, नशीब चमकेल!


राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त (Raksha Bhandhan Shubh Muhurat)


अमृत ​​सर्वोत्तम मुहूर्त: 30 ऑगस्ट रात्री 9.34 ते 10.58 पर्यंत.
योग्य वेळ: 30 ऑगस्ट रात्री 09:03 ते 31 ऑगस्ट सकाळी 07:05 पर्यंत.


भावासाठी राशीनुसार राखीचा रंग


मेष (Aries Zodiac) - लाल रंगाची राखी
वृषभ (Taurus Zodiac) - निळा रंगाची राखी 
मिथुन (Gemini Zodiac) - हिरव्या रंगाची राखी
कर्क (Cancer Zodiac) - पांढऱ्या रंगाची राखी
सिंह (Leo Zodiac) - सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची राखी
कन्या (Virgo Zodiac) - हिरवा रंगाची राखी 
तूळ (Libra Zodiac) - पांढरी किंवा सोनेरी रंगाची राखी 
वृश्चिक (Scorpio Zodiac) - लाल रंगाची राखी 
धनु (Sagittarius Zodiac) - पिवळ्या रंगाची राखी 
मकर (Capricorn Zodiac) - निळ्या रंगाची राखी 
कुंभ (Aquarius Zodiac) - निळ्या रंगाची राखी 
मीन (Pisces Zodiac) - सोनेरी, पिवळ्या किंवा हळदीच्या रंगाची राखी 


हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!



भावाला राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा!


भावाचं औक्षवाण केल्यानंतर त्या मनगटावर राखी बांधताना 3 गाठी नक्की बांधा. शास्त्रानुसार तीन गाठी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतिक मानलं जातं. 




त्याशिवाय पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते. दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते तर तिसरी गाठ ही भावा बहिणीच्या नात्यात प्रेम आणि गोडवा राहवा यासाठी बांधतात. 


हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर शनि गुरु वक्री, तर 700 वर्षानंतर 5 महायोग! 'या' राशींची भावंड होणार मालामाल


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)