Sawan Purnima 2023 : श्रावण पौर्णिमेला 'या' 5 पैकी एकही वस्तू घरी आणा, नशीब चमकेल!

Sawan Purmima 2023 :  श्रावण महिन्यातील आज पौर्णिमा तिथी आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी विशेष महत्त्व आहे. यंदा तब्बल 200 वर्षांनंतर श्रावण पौर्णिमेला अद्भुत योगायोग जुळून आला आहे.

Aug 30, 2023, 07:27 AM IST

Sawan Purmima 2023 : हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि तर्पण अर्पण विधी केले जातात. पंचांगानुसार भाद्र कालावधीत श्रावण पौर्णिमा आली आहे.

1/7

श्रावण पौर्णिमेला शनि आणि गुरु वक्री होणार आहे. तर रवियोग आणि बुधादित्य हे शुभ योगदेखील जुळून आले आहेत. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमला घरात सुख समृद्धी आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणामासाठी उपाय सांगितले आहेत.

2/7

ही पौर्णिमा अतिशय खास असून तब्बल 200 वर्षांनंतर अद्भुत योगायोग निर्माण झाला आहे. अशात 5 पैकी एकही वस्तू घरी आणली तर तुमचं नशीब चमकणार असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

3/7

चांदीचे स्वस्तिक

स्वस्तिक हे हिंदू धर्मात एक अतिशय शुभ चिन्ह मानलं जातं. पूजा आणि यज्ञ या विधीमध्ये स्वस्तिकचं प्रतीक काढण्याची परंपरा आहे. त्याशिवाय घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढला जातो. श्रावणात पौर्णिमेच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर चांदीचं स्वस्तिक लावल्यास घरात सुख-समृद्धी नांदते.

4/7

एकाक्षी नारळ

श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घरी एकाक्षी नारळ आणल्यास देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते अशी मान्यता आहे. 

5/7

पलाश वनस्पती

माता लक्ष्मीला पलाशचे फूल अतिशय प्रिय असते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घरात पलाशचं झाडं लावल्यास आर्थिक स्थिती चांगली होते. 

6/7

सोने

हिंदू धर्मात सोने खरेदी करणं खूप शुभ मानले जाते. त्यामुळे पौर्णिमेला घरात समृद्धीची वाढ कऱण्यासाठी सोनं खरेदी करावे असं सांगण्यात आलं आहे. 

7/7

चांदी

सोने घेता आलं नाही तर चांदीही घेता येते. त्यामुळे माता लक्ष्मीचा आशिर्वाद तुमच्या घरावर कायम राहतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)