Raksha Bandhan 2023 : श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. त्या वेध लागले आहेत ते सणासुदीच्या दिवसांचे. श्रावणातील पहिला सण नागपंचमी आणि त्यानंतर बहीण भावाचा प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. यालाच राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. यंदाचा रक्षाबंधन भावाबहिणींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशिब पालटणार आहे. (raksha bandhan 2023 very auspicious yoga these 4 zodiac signs get more money astrology )


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. नोकरी, व्यवसायात प्रगती होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करणारा हा दिवस ठरणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान द्विगुणीत होणार आहे. 


कन्या (Virgo)


रक्षाबंधन हा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. तणाव कमी होणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही यशस्वी वाटचाल करणार आहात. समाजातील तुमच्या कार्यामुळे तुम्हाला लाभ होणार आहे. कौटुंबिक नात्यात मजबुती मिळणार आहे. तुमचं मनं आनंदी असणार आहे. 
 


हेसुद्धा वाचा - नागपंचमीला अत्यंत दुर्मिळ योग! श्रावणातील पहिला सण 'या' राशींना करणार लखपती


मकर (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा शुभ दिवस अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. परदेशात जाण्याचे योग जुळून आले आहेत. व्यवसायात वाढ होणार आहे. नोकरीतही सर्व बाजूंनी फायदा मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग या राशीसाठी वरदान ठरणार आहे.  नातेसंबंध मजबूत होणार आहे. 


मीन (Pisces)


या राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधन सण शुभ आणि आनंदाचा सिद्ध होणार आहे . हा काळ तुमच्या जीवनातील काही आशादायक घटनांचाही घेऊन येणार आहे.  त्यामुळे चोहूबाजूला आनंदच आनंद असणार आहे. अनेक दिवस रखडलेलं कामं सहज पूर्ण होणार आहे.  जोडीदार आणि कुटुंबीय तुम्हाला साथ देणार आहेत. आयुष्य सुख-समृद्धीने भरणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार असून अचानक धनलाभाचे योग आहेत.


हेसुद्धा वाचा - Vish Yog : शनि चंद्रामुळे बनणार विष योग! 'या' राशींच्या आयुष्यात कोसळणार संकटांचा डोंगर


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)