रक्षाबंधनाचा दिवस अनेक राशींसाठी अतिशय खास असणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी शनि 30 वर्षांनंतर राशी कुंभमध्ये आणि सूर्य देखील सिंह राशीत दिसणार आहे. या सगळ्याचा 12 राशींवर परिणाम होणार आहे. 12 राशींमध्ये 5 राशींसाठी रक्षाबंधनाचा दिवस अधिक लाभदायी असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - मेष राशीच्या लोकांच्या बौद्धिक क्षमतेचा विस्तार होणार आहे. मुलांची अभ्यासात रुची वाढेल. अचानक धनलाभ होईल. महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. 


वृषभ - वृषभ राशीचा गोचर स्वगृही असणार आहे. वस्तूंमधून आनंद मिळेल. आईचं आरोग्य उत्तम राहिल. आरोग्याच्या समस्या कमी होतील. मुलांच्या तब्बेतीची काळजी घ्या. 


मिथुन - मिथुन राशीचे पुरुष पुरुषार्थ दाखवतील. समाजकार्यात अतुलनीय कामगिरी कराल. बहीण-भावंडांमध्ये चांगल नातं निर्माण होईल. जोडीदारासाठी हा काळ शुभ राहील. 


कर्क - वाणी व्यवसाय क्षेत्रातील लोकांना अनुकूल दिवस आहे. परिवारात नवीन कार्य आणि पर्यायाने खर्चाचा योग आहे. वाणीवर नियंत्रण मिळवा अन्यथा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील. 


सिंह - लग्नाचा विचार करणाऱ्यांसाठी हा दिवस शुभ ठरेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. महत्त्वकांक्षा वाढेल. नवीन कामाचा विचार कराल. कलात्मक क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल. 


कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी गोचर सकारात्मक काळात आहे. प्रवासाचा योग येईल. डोळ्यांच्या समस्येवर पैसे खर्च केले जातील. धार्मिक क्षेत्रात विशेष लक्ष द्या. 


तूळ - शेअर बाजार अथवा सट्टा बाजारात अचानक धन लाभ होईल. परिश्रम महत्त्वाचे आहे त्यामुळे मेहनत करायला लाजू नका. संतान प्राप्तीचा योग आहे. 


वृश्चिक - सरकारी नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. हृदय रोगाशी संबंधी समस्या डोकं वर करतील. निश्चयावर अडून राहा. 


धनू - धनू राशीच्या लोकांना भाग्याचा काळ आहे. मुलांकडून वडिलांना आनंदाची बातमी मिळेल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी कामात विशेष लक्ष द्या. 


मकर - मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. लघवीशी संबंधित आजार डोकं वर करतील. नवीन घराचा विचार कराल. म्हाताऱ्या लोकांची विशेष काळजी घ्या. 


कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोडीदारासोबत छान वेळ घालवाल. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा. 


मीन - मीन राशीच्या लोकांनी आजचा दिवस खास घालवण्याकडे विशेष लक्ष द्या. डोळ्यांच्या समस्या डोकं वर करतील. प्रवासामुळे थकवा जाणवेल.