Ramayan Katha : `या` तीन कारणांमुळे सीतेने हनुमानासोबत लंकेतून निघण्यास दिला होता नकार
Ramayan Katha: हिंदू धर्मग्रंथांमध्ये भगवान श्रीराम यांचे लाखो भक्त आहेत. अशा स्थितीत रामायणाची कथा प्रत्येक घरात ऐकायला मिळते. असे मानले जाते की, केवळ प्रभू रामाचे नामस्मरण केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात. अशा परिस्थितीत आज आपण रामायणाशी संबंधित एक घटना जाणून घेत आहोत. ज्यामध्ये माता सीतेने लंकेतून येण्यास नकार दिला होता.
Ram Ji Or Sita Mata: भगवान श्रीराम हे सनातन धर्मातील सर्वात आराध्य देवतांपैकी एक मानले जातात. प्रभू श्रीरामाच्या नावात इतकी शक्ती आहे की माणसाच्या आयुष्यातील सर्व दु:ख, वेदना दूर होतात. अशा वेळी प्रत्येक घरात रामायण ऐकू येते. केवळ रामायण श्रवण केल्याने माणसाचे जीवन समृद्ध होते आणि त्याला प्रभू श्री रामाचा आशीर्वाद मिळतो. आज आपण रामायणात वर्णन केलेल्या कथेबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये माता सीतेने लंकेतून हनुमानासोबत येण्यास नकार दिला होता. हनुमान माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले तेव्हा सीतेने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. धार्मिक मान्यतेनुसार माता सीतेच्या नकारामागे अनेक कारणे सांगितली जातात.
जाणून घ्या माता सीता हनुमानासोबत लंकेतून का गेली नाही?
पतिव्रता धर्माचे पालन केले
धार्मिक ग्रंथानुसार जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले होते तेव्हा तिला अशोक वाटिकेत ठेवले होते. माता सीतेला वाचवण्यासाठी हनुमानअशोक वाटिकेवर येतात, परंतु माता सीतेने आपल्या पतिव्रता धर्मानुसार त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. वाल्मिकी रामायणानुसार, जर माता सीता हनुमानजींसोबत गेली असती तर ते त्यांच्या पतीव्रता धर्माच्या विरोधात गेले असते. तिला तिच्या इच्छेनुसार इतर कोणत्याही पुरुषाला स्पर्श करता येत नव्हता. तिने तसे केले असते तर पतिव्रता भंग झाली असती.
रावणाचा नाश
ज्योतिषशास्त्रानुसार, माता सीतेला माहित होते की रावणाचा नाश भगवान रामाच्या हातानेच होईल. रावणाचा अंत करण्यासाठी भगवान विष्णूने श्रीराम म्हणून जन्म घेतला. अशा स्थितीत ती हनुमानासोबत गेली असती तर श्रीरामाचा उद्देश अपूर्णच राहिला असता. रावणाचा अंत आणि अधर्मावर धर्माचा विजय होण्यासाठी श्रीरामांचे लंकेत येणे अत्यंत महत्त्वाचे होते. याच कारणामुळे देवी सीतेनेही हनुमानासोबत जाण्यास नकार दिला होता.
श्रीरामाच्या सामर्थ्याबद्दल आदर
शास्त्रानुसार, माता सीतेने हनुमानासोबत जाण्यास नकार देण्याचे तिसरे कारण म्हणजे श्रीरामाच्या सामर्थ्याबद्दलचा आदर. तिने हनुमानासोबत लंका सोडली असती तर इतिहासात भगवान श्रीराम दुर्बल म्हटले गेले असते. यासोबतच माता सीतेला लंकेतून वाचवल्याबद्दल हनुमानाची स्तुतीही झाली असती. अशा परिस्थितीत प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुतीवर आधारित आहे. ZEE 24 Taas.Com याची पुष्टी करत नाही.)