`...म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो`, कोणी आणि का केला हा दावा?
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पण ही रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरोधात असून भूत-पिशाच्चांचा प्रवेश करेल अशी भीती, शंकराचार्य यांनी व्यक्ती केली आहे.
Ram Mandir : सर्वत्र सध्या श्री रामाचा जप ऐकायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. अख्ख देश राममय झालेला दिसत आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. पण या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. त्यामधील कारणही तेवढंतच भीतीदायक आहे. रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा ही शास्त्रांच्याविरोधात आहे, असा त्यांचा दावा आहे. (Ram Mandir so ghosts can enter the Ram temple idol who claimed and why )
'...म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो'
हिंदू धर्मात प्रत्येक उत्सव आणि सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची पूजा आणि प्राणप्रतिष्ठा ही विधीवत झाल्यास त्यामध्ये अडथळे येऊ शकतात, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. अगदी एखाद्या वास्तूची प्राणप्रतिष्ठापणा, तिची जागा आणि तिथी यासगळ्याला अतिशय महत्त्व असतो. त्या वास्तूच्या हिंदू धर्मानुसार सर्व बाबीची पूर्तता झाली नाही तर ती वास्तू अशुभ परिणाम देते, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा धर्माविरोधात?
उत्तराखंडच्या जोतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी अयोध्याला न जाण्याच कारण सांगितल्यावर अनेक भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ते म्हणाले की, राम मंदिराच्या बांधकामाचं काम अजून पूर्ण आहे. राम मंदिराचा पहिला मजला बांधून झाला आहे. या मंदिराचे दोन मजले हे 2024 डिसेंबरला तयार होणार आहे. याचा अर्थ या मंदिराचं काम हे अपूर्ण आहे. अशामध्ये जेव्हा तुम्ही अपूर्ण बांधकाम झालेल्या वास्तूमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करतात हे सनातन धर्माच्या विरोधात असल्याचं स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं म्हणं आहे.
तरदुसरीकडे सर्व काही धर्मग्रंथांतील पद्धतीनुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्तीपूजा झाली नाही, तर तिथे सैतानी शक्तींचा प्रवेश होतो आणि सर्वत्र अराजकता माजते, असं पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती (Shankaracharya Nischalananda) यांचं मत आहे.
राम मंदिर ट्रस्ट काय म्हणाले?
हिंदू धर्मग्रंथांनुसार अयोध्येतील राम मंदिरात पूजन न करण्याच्या मुद्द्यावरुन वाद वाद निर्माण झाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टने स्पष्टीकरण दिलं आहे. शंकराचार्यांच्या या विधानावर राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त चंपत राय यांनी देशवासियांना सांगितलं आहे की, अयोध्येतील राममंदिर हे रामानंद संप्रदायाचं असून शैव, शाक्य आणि संन्याशांचं याच्याशी काही संबंध नाही. रामानंद पंथाने केवळ विष्णू अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे पालन केलंय. तसंच सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतलं, असं स्पष्टीकरण चंपत राय यांनी दिलं आहे.