Ram Navami 2024 : चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान विष्णूने मानव अवतारात माता कौशल्य यांच्या पोटी श्रीराम रुपात जन्म घेतला. वाल्मिकी रामायणानुसार कर्क राशीत दुपारी अभिजीत मुहूर्तावर श्रीरामाचा जन्म झाला. 17 एप्रिलला बुधवारी रामनवमीचा उत्साह साजरा करण्यात येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीला दोन दुर्मिळ योग जुळून आले आहेत. त्यामुळे काही राशींसाठी हे राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. (Ram Navami 2024 will be lucky for these zodiac sign people Gajakesari and Malavya Rajyoga will bring benefits)


रामनवमी 2024 रोजी दुर्मिळ योगायोग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र कर्क असणार आहे. तर श्रीरामाच्या जन्म वेळेच्या क्षणी सूर्य दहाव्या भावात आणि उच्च राशीत असणार आहे. यादिवशी गजकेसरी आणि मालव्य राजयोग असणार आहे. यामुळे काही राशींना धनलाभासह त्यांच्या मान सन्मात वाढ होणार आहे. 


मेष रास (Aries Zodiac)  


रामनवमीपासून या राशींच्या लोकांची समस्या दूर होणार आहे. मुलं किंवा कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. कार्यक्षेत्रात कामाचं कौतुक होणार आहे. तुमची कार्य क्षमता पाहून वरिष्ठ तुम्हाला बढती किंवा मोठी जबाबदारी देणार आहेत. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळणार आहे. जोडीदारासोबत नातं चांगलं होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


मीन रास (Pisces Zodiac)  


या राशीच्या लोकांवर श्रीरामाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घरी चांगला वेळ व्यतित करणार आहे. आयुष्यातील समस्या संपुष्टात येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुम्ही बचत करण्यातही यशस्वी होणार आहात. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असणार आहे. एखादी धार्मिक स्थळाला तुम्ही भेटणार आहात. 


तूळ रास (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली स्वप्ने पुन्हा एकदा पूर्ण होणार आहेत. वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याचा तुम्ही विचार करणार आहात. श्रीरामाच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगल्या स्थितीत येणार आहे. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने आर्थिक लाभ होणार आहे. त्यासोबतच तुम्ही बचत करण्यात यशस्वी होणार आहात. करिअर आणि व्यवसायात तुम्हाला फायदा मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)