Rang Panchami 2023 Upay in marathi : आज रंगपंचमी...आजच्या दिवशी महाराष्ट्रातील नाशिकमध्ये रंगा उत्सव होतो. होळीनंतर पाच दिवसांनी येणारी रंगपंचमी नाशिककरांसाठी (Nashik Rangpanchami) खास असते. पेशवेकालीन परंपरा असलेली नाशिकची रहाडपंचमी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला देवता होळी खेळण्यासाठी पृथ्वीवर येतात, म्हणून तिला रंगपंचमी असे म्हणतात. या दिवशी देवतांसह होळी (dev panchami 2023) खेळण्याची वेळ सकाळी 09.38 ते दुपारी 12.37 अशी आहे. अशा या रंगपंचमीला ज्योतिष शास्त्रात आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. (Astrology News in marathi)


रंगपंचमीला 'हे' उपाय करा! (Rang Panchami 2023 Upay)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रंगपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीला गुलाल अर्पण करा. असं केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. (Rang Panchami 2023 Nashik Rangpanchami dev panchami 2023 Upay money Astrology News in marathi)


भगवान विष्णूसह धनाची देवी लक्ष्मीची पूजा करावी. शिवाय भगवान विष्णूसह धनाची देवी लक्ष्मीची पूजा करावे. हा उपाय केल्यास आयुष्यात सकारात्मक उर्जा मिळते. 


ज्योतिष शास्त्रानुसार पिवळ्या कपड्यात एक नाणे आणि हळदीचा एक गुंठ घालून तो चांगला बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावा. असं केल्याने तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते. 


या दिवशी देवतांसह होळी खेळण्याची वेळ सकाळी 09.38 ते दुपारी 12.37 अशी आहे. यावेळी अबीर-गुलाल, हळद, चंदन यासोबतच आकाशात फुलांचे रंग उधळल्यास सर्व देवी-देवता खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यात सुखी समृद्धी नांदते. 


रंगपंचमीला राधा-कृष्णाला पिवळा रंग अर्पण करा. असं म्हणतात की यामुळे इच्छित जीवनसाथी मिळण्याची इच्छा पूर्ण होते.


विवाहित महिलांनी रंगपंचमीच्या दिवशी देवी पार्वतीला मेकअपचे सामान अर्पण करावं. असं केल्यानं पतीवर येणारे  संकट दूर होतात आणि सौभाग्य कायम राहते.