Horoscope 17 September : या राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीमुळे अडचण होण्याची शक्यता!
जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेष
आजच्या दिवसी मानसिक त्रास होऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी मुलांसोबत वेळ घालवा. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला एखादी खास भेट मिळू शकते. कर्जाची परतफेड करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मित्रांचे सहकार्य मिळेल.
वृषभ
व्यापारात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा. मित्राची भेट होईल. कोणाशीही वाद घालू नका. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे
मिथुन
तुमच्या नम्र स्वभावाची सर्व प्रशंसा होईल. कोणत्याही तिसऱ्यामुळे वैवाहिक जीवनात आंबटपणा येऊ शकतो. वादात अडकू नका. स्वतःसाठीही वेळ काढा. तुमच्यावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडू देऊ नका.
कर्क
नोकरीत बदल केल्याने लाभ मिळेल. गाडी खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल.उधार दिलेले पैसे परत मिळतील.
सिंह
आज दुपारपर्यंत चांगली बातमी समोर येणार आहे. कोणालाही पैसे देऊ नका. नोकरीत प्रमोशन मिळेल.
कन्या
आज कामाचा ताण राहील त्यामुळे स्वभाव चिडचिडा होऊ शकतो. एखादा मित्र तुम्हाला आर्थिक मदतीसाठी विचारू शकतो. मित्र किंवा कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत असू शकतो. प्रेम जीवन आनंदी राहील.
तूळ
आजच्या दिवशी नवं घर खरेदी करण्याचे योग आहेत. मुलांविषयी चिंता दूर होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
वृश्चिक
तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये काम आणि कुटुंब यांच्यात समतोल राखा. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सुखद आश्चर्य मिळू शकतं.
धनु
कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने गुंतवणूक केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मन प्रसन्न राहील. सर्जनशील कार्याचा आनंद घ्याल. प्रियकराची भेट होऊ शकते.
मकर
घरात भांडणं होणार नाही, याची काळजी घ्या. वडिलांचा सल्ला घ्यावा. नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.
कुंभ
आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. व्यापारातील अडचणी दूर होतील. साथीदाराचं आरोग्य बिघडण्याची शक्यता.
मीन
घरात पाहुणे येणार असल्याने तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. तुम्ही प्रेमात हरवलेले असाल. आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व नियमांची छाननी केली जाईल. आज तुम्हाला वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल जाणवणार आहेत.