मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिअरमध्ये बदलांमुळे शुभ लाभ होतील. तुमच्या आहाराची काळजी घ्या. विचारपूर्वक कृती करा.


वृषभ 


आजच्या दिवशी वेळेचा सदुपयोग करा. थांबलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या प्रियजनांची साथ नक्कीच मिळेल.


मिथुन


आजच्या दिवशी तुम्हाला मुलाच्या बाजूने चिंता राहील. तुमची जवळची नाती सांभाळून ठेवा.


कर्क


मालमत्तेत गुंतवणूक करू नका. आपल्या सामानाची काळजी घ्या. 


सिंह


मालमत्ता खरेदीचे योग आहेत. कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो. 


कन्या


तुमच्या नातेसंबंधांचा आदर करा. एखाद्या गरजवंताला नक्की मदत करा. संध्याकाळपर्यंत वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.


तूळ


दुपारनंतर तणाव निर्माण होऊ शकतो. कोणत्याही कामात दिरंगाई करू नका. 


वृश्चिक


गुडघ्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. आपल्या वडिलांचा आदर करा. 


धनु


दिवसभर कामात व्यस्त राहाल. घराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.


मकर 


वाहन जपून चालवा. निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. 


कुंभ


भावंडांमध्ये प्रेम वाढेल. कोणतेही काम करण्यापूर्वी विचार करा.


मीन


दिवस आनंदाने भरलेला असेल. तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा.