मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी आवश्यक काम वेळेवर करा. शिवाय महत्त्वाच्या कामांमध्ये वडिलांचा सल्ला अवश्य घ्या. नात्यांकडे दुर्लक्ष करु नका.


वृषभ


आजच्या दिवशी या जुन्या इच्छा पूर्ण होतील. व्यापारात परिवर्तन होण्याचे योग आहेत.


मिथुन 


आजच्या दिवशी मानसिक ताणतणाव राहिल. मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.


कर्क


आजच्या दिवशी नवीन संपत्तीचा लाभ होईल. अपत्य पक्षाकडून सुख मिळेल. मित्रांना मनवण्याचा प्रयत्न करा.


सिंह


या राशीच्या व्यक्तींनी दूरच्या प्रवासाचा योग आहे. प्रेमात यश मिळण्याचे योग आहेत. रागावर नियंत्रण ठेवा.


कन्या


आजच्या दिवशी मन आनंदी असणार आहे. अपत्य प्राप्तीचा योग आहे. पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.


तुळ


आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी नवीन व्यापारात गुंतवणूक करु नये. गाडी चालवताना निष्काळजीपणा करु नका. मान सन्मान मिळू शकतो.


वृश्चिक


आजच्या दिवशी संध्याकाळी वेळेवर घरी जा. उधार दिलेले पैसे परत मिळणार आहेत. अपत्य प्राप्तीचे योग आहेत.


धनु


आजच्या दिवशी तुम्हाला रोजगारात मोठं यश मिळणार आहे. आकस्मित धन प्राप्तीचे योग आहेत. जीवनसाथीचा सहयोग मिळेल.
 
मकर


नोकरी किंवा व्यापारात बदल करु नका. पैसे उधार देऊ नका. मिठाई दान केल्याने फायदा होईल.


कुंभ


मोठ्या यात्रेचा योग आहे. जुन्या मित्रांची भेट होणार आहे. दिवसातील धावपळ वाढेल.


मीन


मोठ्या भावाची मदत होणार आहे. कुटुंबात भांडणं करु नका. प्रवास टाळणे फायदेशीर राहील.