मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यवसायाच्या दृष्टीने आजचा दिवस फारसा विशेष असणार नाही. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जे अविवाहित आहेत त्यांना त्यांच्यामध्ये खरं प्रेम मिळू शकतं.


वृषभ


कठीण काळात लोकांची साथ मिळेल. मानसिक तणावातून आराम मिळेल. व्यवसायात भागीदारी टाळा. रागावर नियंत्रण ठेवा.


मिथुन 


आरोग्य सामान्य राहील. नोकरीत तुमच्या योजना यशस्वी होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील.


कर्क 


आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात काही अडचण येऊ शकते.


सिंह


बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. कार्यालयातील अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरीत प्रमोशन मिळू शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.


कन्या


आज कन्या राशीच्या व्यावसायिकांना फायदा होईल. नोकरदार लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने कामे हाताळतात. वैयक्तिक संबंधांमध्ये प्रेम कायम राहील. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील.


तूळ


तूळ राशीच्या व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्या. कला आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल. प्रेमप्रकरणात सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


वृश्चिक


आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही चांगल्या बातमीने आनंद मिळेल. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत पदोन्नती होऊ शक्यता आहे


धनु


आज तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. कोणत्याही कामामध्ये घाई करू नका धीर धरा. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रेम जीवनात गोडवा राहील. आज कोणतंही नवीन काम सुरू करू नका.


मकर


आजच्या दिवशी तणाव कमी होईल. कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होतील.


कुंभ


तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. मौजमजेसाठी वेळ जाईल. कार्यालयात विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायात मित्रांचे सहकार्य मिळेल.


मीन


सासरच्या मंडळींकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. ध्यान आणि योगाने तुमचा राग शांत करण्याचा प्रयत्न करा. प्रियकराशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो.