मुंबई : हिंदू वेदशास्त्रांमध्ये अग्नीला देवतेचं स्वरुप प्राप्त आहे. त्यामुळं हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्यापूर्वी देवापुढे दिवा लावला जातो. दिवा हे सकारात्मक आणि प्रकाशाचं प्रतीक आहे. शिवाय दिव्याच्या उजेडामुळं फक्त प्रकाश पडतो असं नाही, तर दिवा दारिद्र्य दूर करतो असंही म्हणतात. यासाठीच संध्याकाळच्या वेळीही घरात आणि दारात दिवा लावला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही शुभकार्याच्या वेळीसुद्धा दिवा लावला जातो हे खरं पण, त्यातही पीठाचे दिवे लावण्याला अनेकांचं प्राधान्य असतं. त्यामागेही एक महत्त्वाचं कारण आहे. एखादी महत्त्वाकांक्षा, एखादी इच्छा, मनोकामना पूर्ण करण्यासाठी पीठाचे दिवे लावले जातात. अशा वेळी कोणी काही इच्छा मागितली असल्यास पीठाच्या दिव्याला प्राधान्य मिळतं. 


तर, मातीच्या दिव्यांना प्रचंड शुभ मानलं जातं. यामध्ये देवी अन्नपूर्णेचा वरदहस्त असतो असं म्हणतात. 


असंही म्हटलं जातं की, जर जातक दुर्गा, मारुती, गणपती, शंकर, विष्णूचे अवतार श्रीराम आणि कृष्णाच्या मंदिरांमध्ये पीठाचे दिवे लावल्याल सर्व इच्छा पूर्ण होतात. काही ठिकाणी तांत्रिक कारणांनीही पीठाचे दिवे वापरतात. 


कर्जमुक्ती, लवकर लग्न होण्यासाठी, आजारपण दूर करण्यासाठी, अपत्यप्राप्तीसाठी आणि इतर बरीच संकटं दूर करण्यासाठी एक ते 11 दिवे लावले जातात. 


पीठाचे दिवे तयार करताना ही बाब लक्षातच ठेवा 
पीठाचा दिवा तयार करताना त्यामध्ये हळदही घ्या. पीठ मळतानाच सोबतीला थोडी हळद घ्या. हा दिवा तूप किंवा तेलानं पेटवा. जेव्हा केव्हा तुमची एखादी इच्छा, मनोकामना पूर्ण होईल तेव्हा दिवे मंदिरातच लावा. संकल्प केलेली दिव्यांची संख्या पूर्ण करा आणि लावणाऱ्या प्रत्येक दिव्यासोबत संकल्पही बोला.