मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपल्या कुटुंबासाठी एक तरी घर बांधायचे असते. नवीन घर विकत घेणे किंवा बांधणे ही व्यक्तीच्या आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न असतं. भाड्याच्या घरात राहून आयुष्य घालवणारे अनेकजण आहेत. अशा वेळी नवीन घर घेतल्यानंतर कुटुंबात सुख-समृद्धीसाठी वास्तु शास्त्रानुसार काही गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यानुसार कोणत्याही नवीन घरात प्रवेश करण्यासाठी, गृहप्रवेशावेळी कथा, हवन करणे आवश्यक आहे. नवीन घरात जाण्याचा विचार करत असाल, तर गृहप्रवेश करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.


रविवार, मंगळवार आणि शनिवारी या दिवशी नवीन घरात प्रवेश करू नये.


श्रीगणेशाला प्रथम पूजेचा दर्जा आहे. त्यामुळे गृहप्रवेशावेळी श्रीगणेशाला आपल्या घरात प्रथम स्थान द्यावे.


घरात प्रवेश करण्यापूर्वी गणेशाच्या मूर्तीसह श्री महालक्ष्मीचे शंख आणि श्री यंत्र स्थापन करावे. यामुळे घरातील नकारात्मकता संपते. 


गृहप्रवेशाच्या दिवशी शक्य असल्यास कोणत्याही गरीब आणि गरजूला अन्नदान करावे, असे केल्याने घरात समृद्धी येते. 


कोणत्याही व्यक्तीला नवीन घरात प्रवेश करण्यासाठी दिवस, तिथी आणि नक्षत्र खूप महत्वाचे असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या नव्या घरात प्रवेश करण्याची तयारी करत असाल, तर या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.