Rishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?
Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे.
गणेश चर्तुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचं सुद्धा व्रत केलं जातं. ऋषीपंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्व आहे. या दिवशी सप्तऋषींची पूजा करून त्यांना वंदन केले जाते. हिंदू धर्मात ऋषीपंचमीला अनन्य साधारण महत्त्व आहे. यादिवशी खास पद्धतीने भाजी बनवली जाते. या भाजीला ऋषीची भाजी असं म्हणतात. तब्बल 11 भाज्या वापरून व तेलाचा एक थेंबही न वापरता ऋषीची भाजी केली जाते. ऋषीच्या भाजीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्याही शहरात फारशा मिळत नाहीत. त्यामुळं फक्त 11 भाज्या वापरुनही तुम्ही ही भाजी करु शकतात. तेल न वापरताही ही भाजी कशी करायची याची खास रेसिपी जाणून घ्या. महत्त्वाचं म्हणजे ऋषीपंचमीची ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
ऋषीची भाजी का केली जाते?
ऋषीपंचमीचं व्रत सुवासिनी महिला करतात. यादिवशी महिलांनी धान्य खायचे नसते. शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्ले जात नाहीत. म्हणूनच या दिवशी केवळ शेताच्या बांध्यावर उगवलेल्या भाज्या आणि कंदमुळे खाल्ली जातात.
ऋषीपंचमीच्या 11 भाज्या
अळूची पानं, लाल देठं, रताळी, कच्ची केळी, सुरण, लालभोपळा, शिराळी, लाल माठाचे देठ, कणीस, शेंगदाणे, खोबरं घालतात, मिरच्या घातलात. यात मुख्य भाजी ही अळूची असते त्यात या सगळ्या भाज्या घातलया जातात.
ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी
अशी तयार करा ऋषीपंचमीची भाजी?
सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या आणि चिरुन घ्या. या भाज्यांसोबत दोन मिरच्या देखील घ्या. भाज्यांना मीठ लावून व्यवस्थित मिक्स करुन घ्या. भाज्या व्यवस्थित मिक्स करुन घेतल्यानंतर गॅसवर एक जाड पातेले ठेवा. महत्त्वाचं म्हणजे या भाज्यांना तेलाचा वापर केला जात नाही. जाड तळाचं भांड घ्या. या भांड्यात भाजी घालून ती झाकून ठेवा. झाकण ठेवल्यामुळे वाफेच्या पाण्यात ही भाजी सिजेल. वाफेवर भाजी छान शिजेल. थोडं मीठ घाला आणि भाजी परतत राहा. आवश्यकता असेल तरच पाणी घाला. भाजी थोडी शिजत आली की त्यात चिंचेचा कोळ घाला आणि संपूर्ण भाजी शिजल्यावर वरुन खोबरं टाकून ढवळा. ऋषीची भाजी तयार झाल्यावर ती गरमागरम बाजरी, ज्वारी, तांदळाची भाकरीसोबत खाल्ल्यास छान लागते.