Budh-Shani Yog 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. बुध आणि शनि हे अनुकूल ग्रह मानले जातात. 18 सप्टेंबरपासून हे दोघेही समोरासमोर आल्याने एक योग तयार होणार आहे. बुध आणि शनीमुळे समसप्तक योग तयार होणार आहे. या काळात बुध सिंह राशीत असणार आहे आणि शनि कुंभ राशीत असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान समोरासमोर असल्यामुळे शनीचा शुभ प्रभाव तर वाढणार आहे. दरम्यान यावेळी बुध ग्रहाची परिणाम देण्याची क्षमताही वाढणार आहे. बुध आधीच सिंह राशीमध्ये आहे, परंतु 17 सप्टेंबरपर्यंत सूर्य सिंह राशीमध्ये असल्यामुळे शुभ परिणाम देऊ शकला नाही. सूर्य कन्या राशीत प्रवेश करताच बुध पूर्ण परिणाम देऊ शकेल. जाणून हा समसप्त योग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरणार आहे.


मेष रास


या राशीमध्ये बुध पाचव्या स्थानी आणि शनी अकराव्या स्थानात असणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. तसंच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पगारदार लोकांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार, गुंतवणूक इत्यादींमध्ये भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. 


सिंह रास


या राशीच्या पहिल्या घरात बुध असेल आणि शनी सातव्या घरात असणार आहे. या काळात शनीच्या प्रभावामुळे तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणार आहात. व्यवसायात किंवा भागीदारीत त्याचा फायदा होणार आहे. तुमच्या पत्नीसोबतचा तणाव किंवा वाद कमी करण्यासाठी तुम्ही अधिक हुशारीने वागाल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती आणि उत्पन्नात वाढ करण्याचे आश्वासन मिळणार आहे.


कुंभ रास


या राशीच्या लोकांसाठी बुध सातव्या भावात असणार आहे. म्हणजेच या काळात तुम्ही तुमच्या पत्नीच्या सल्ल्याचे पालन करावे. व्यवसायासाठी हे फायदेशीर ठरू शकते. पैशांचा स्त्रोत वाढणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. या काळात कौटुंबिक जीवन सुखकर राहणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)