मुंबई : अनेकदा आपण पाहतो की, लोकांना त्यांच्या हाताच्या रेषांवरून भविष्य समजतं. परंतु फार कमी लोकांना हे माहित असतं की, आपल्या पायाच्या रेषाही तुमचं भविष्य सांगू शकतात. असं समुद्रशास्त्रात सांगण्यात आलं आहे. हस्तरेखा शास्त्र (Hastrekha Shastra) आणि समुद्र (Samudra Shastra) मध्ये भगवान विष्णूंच्या चरणी असलेल्या रेषा आणि चिन्हं सांगितली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही शुभ चिन्हं भगवान राम, श्रीकृष्ण, भगवान महावीर, गौतम बुद्ध इत्यादींच्या पायाच्या तळव्यावरही होती. असं म्हटलं जातं की, आपल्या हाताच्या रेषेत आपल्या भूतकाळाची आणि भविष्याची अनेक रहस्यं दडलेली असतात. पण तुम्हाला माहितीये का, की आपल्या पायावरच्या रेषाही आपलं भविष्य देखील सांगतात.


समुद्रशास्त्रानुसार पायाच्या तळव्याच्या रेषा वाचून भविष्य सांगितलं जातं, चला जाणून घेऊया तुमच्या पायाच्या रेषा काय सांगतात.


  1. पायाच्या मध्यापासून मधल्या बोटापर्यंत एखादी रेषा गेली तर त्या व्यक्तीला जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. त्यात संपत्ती आणि संतती सुखाचाही समावेश होतो.

  2. पायात शंख, चक्र, मासाचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला मंत्रिपद आणि चल-अचल संपत्ती मिळते. ज्या व्यक्तीच्या पायात ध्वज, छत्री, चक्र, स्वस्तिक, पद्म इत्यादी असतात तो सम्राट असतो. 

  3. पायाच्या उजव्या बाजूला चक्र फिरण्याचं चिन्ह असल्यास आणि जपमाळ, अंकुश इत्यादी चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला राजसुख प्राप्त होतो. पायांवर सूर्य, चंद्र, नक्षत्र, पृथ्वी, चक्र, चामर, व्यंजन, तोरण, सिंह, विद्यार्थी, स्वस्तिक, पूर्णा, कुंभ, मकर, हंस, अंकुश, पद्म अशी एक किंवा अनेक चिन्हं असतील तर ती व्यक्ती भाग्यवान असते. शिवाय या व्यक्तीला संपत्ती आणि जीवनातील सर्व सुख प्राप्त होतं.

  4. जर व्यक्तीच्या पायाच्या बोटात उभी रेषा असेल तर ती व्यक्ती विवाहाच्या बाबतीत खूप भाग्यवान असते. तिचं लवकरच लग्न होतं आणि तिला खूप प्रेमळ जोडीदार मिळतो.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुती आणि संदर्भांच्या आधारे उपलब्ध झाली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)