Samudra Shastra : ओठांवरून समजू शकतो तुमचा स्वभाव आणि बरंच काही....
प्रत्येक माणसाचा चेहरा आणि ओठ वेगळे असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून बरीच माहिती मिळण्यास मदत होते.
मुंबई : ओठ हे केवळ सौंदर्याचं प्रतीक नसतं तर ओठांवरून त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी देखील समजू शकते. पुरुष आणि स्त्रिया यांच्या ओठांवरून तुम्ही त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकता. सामुद्रिक शास्त्रामध्ये असं मानलं जातं की, केवळ ओठ पाहूनच व्यक्तीचा स्वभाव, त्याचे गुण शिवाय भाग्य यांचा अंदाज लावता येतो. प्रत्येक माणसाचा चेहरा आणि ओठ वेगळे असतात, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून बरीच माहिती मिळण्यास मदत होते.
शरीरातील प्रत्येक गोष्टीचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व असतं. आज आपण पुरुषाच्या ओठांबद्दल जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुरुषांचं ओठ पाहून त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं ओळखता येऊ शकतं.
लाल ओठ
एखाद्या व्यक्तीचे ओठ लाल असतील तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि धैर्यवान असते. ते उच्च शिक्षित असतात. शिवाय कोणत्याही कामात सावधगिरी बाळगणं हा त्यांचा विशेष गुण असतो.
पातळ ओठ
ज्या व्यक्तीचे ओठ फार पातळ असतात, त्या पुरुषाचा स्वभाव स्त्रियांशी जुळतो. पैसा वाचवणं याला ते प्राधान्य असते. अशा पुरुषांना करिअरसाठी फारशी धडपड करावी लागत नाही. त्याचप्रमाणे अशा पुरुषांना सुंदर वस्तू खरेदी करण्याची आवड असते.
जाड ओठ
एखाद्या व्यक्तीचे ओठ फार जाड असतील तर ती व्यक्ती क्रूर किंवा कठोर असू शकते. अशी माणसं सामाजिक स्वरुपात अलिप्त राहतात.
खालच्या बाजूचा ओठ जाड
ज्या पुरुषाच्या खालच्या बाजूचा ओठ जाड असतो, ती व्यक्ती पैशांसंदर्भात नेहमी चिंतेत असते. ही व्यक्ती अभिमानी स्वभावाची आणि राजा प्रमाणे सुख भोगणारी असते.
गडद ओठ
ज्या व्यक्तीचे ओठ काळे असतात ती व्यक्ती शिक्षणात हुशार, बुद्धिवान, चतुर आणि संधीचे सोनं करणारी असते. अशा व्यक्ती आपली बुद्धी आणि विवेकच्या बळावर परिस्थिती आपल्या अनुकूल बनवून घेतात.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)