अशा बोटांच्या स्त्रिया पतीचं भाग्य उजळवतात...
शरिराची ठेवण, ओठ, तिळ, पायांचे आकार, बोटांचे आकार यावरुन व्यक्तिचे गुणदोष, स्वभाव याचा अंदाज लावला जातो. समुद्रशास्त्रामध्ये महिलांच्या बोटांच्या आकाराविषयी देखील माहिती दिली आहे. या माहितीनुसार बोटांच्या आकारावरुन महिला पतीसाठी भाग्यशाली असल्याचं बोललं जातं.
Samudrik Shastra: समुद्रशास्त्र Samudra Shastra वैदिक ज्योतिष शास्त्राची Astrology एक शाखा आहे. या शास्त्रामध्ये व्यक्तिच्या शरिराची ठेवण, ओठ, तिळ, पायांचे आकार, बोटांचे आकार यावरुन व्यक्तिचे गुणदोष, स्वभाव याचा अंदाज लावला जातो. समुद्रशास्त्रामध्ये महिलांच्या बोटांच्या women fingers आकाराविषयी देखील माहिती दिली आहे. या माहितीनुसार बोटांच्या आकारावरुन महिला पतीसाठी भाग्यशाली असल्याचं बोललं जातं. आज आपण अशाच बोटांच्या आकारविषयी जाणून घेवूया.
अशा मुली कुटुंबाची काळजी घेतात
ज्या मुलींची बोटं जाड असतात. त्या मुली वाईट वेळ संयमाने पार पाडतात. अशा मुली नेहमी कुटुंबाला प्राधान्य देतात. मात्र या महिलांचा स्वभाव personality check थोडा खर्चीक असतो. तसंच ज्या महिलांची हाताची बोटं गोल आणि लांब असतात अशा मुली लग्नानंतर पतीसाठी भाग्यशाली ठरतात. प्रत्येक क्षणी या महिला पतीसोबत उभ्या असतात. अशा मुलींसोबत लग्न करणाऱ्या तरुणाचं आयुष्य स्वर्गापेक्षाही सुंदर बनतं
गंभीर आणि प्रामाणिक
ज्या महिलांचे हाताचे मधले बोट इतर बोटांच्या तुलनेने लांब आणि रुंद असतं अशा महिला अत्यंत प्रामाणिक असतात. ज्या महिलांच्या हाताचे मधले बोट लांब आणि पातळ असते अशा महिलांचा स्वभाव गंभीर असतो. या स्वभाच्या महिला नेहमीच आपल्या पतीला चांगलं मार्गदर्शन करत असतात.
कलात्मक स्वाभावाच्या मुली
ज्या मुलींची हाताची बोटं लांब आणि पातळ असतात अशा मुली कलात्मक असतात त्यांना कलेची आवड असते. कलेची उत्तम पारख अशा मुलींना असते. अशा बोटांच्या मुली कुणावरही अवलंबून नसतात. त्या नेहमी स्वावलंबी असतात. अशा मुली लग्नासाठी सर्वश्रेष्ठ असल्याचं सांगितलं आहे.
डिसक्लेमर
वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर अधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा