Sanyasi Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशी आणि 9 ग्रहांना अतिशय महत्त्व आहे. कुंडलीतील 9 ग्रहांची स्थिती ही जाचकाच्या वर्तमान आणि भविष्य ठररते. ग्रह हे एका ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. त्यामुळे मानवाच्या आयुष्यात त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम दिसून येतो. कुंडलीतील ग्रहांची स्थिती ही शुभ आणि अशुभ योगही तयार करतात. (sanyasi yoga will be formed on these zodiac signs get rich)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच काही राशींच्या कुंडलीत संन्यासी योग तयार होणार आहे. अशा स्थितीत जाचकाच्या आयुष्यात अमाप संपत्ती आणि करिअरमध्ये यश प्राप्त होईल. एवढंच नाही या लोकांना नशिबाची साथ मिळणार असून त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. चला मग जाणून घेऊयात कुठल्या आहेत या भाग्यशाली राशी...


'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस 


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी संन्यासी योगामुळे अतिशय लाभ होणार आहे. या लोकांना कार्यक्षेत्रात अपार यश आणि प्रगती प्राप्त होणार आहे. येणारी कुठलीही संधी गमवू नका. बिझेनस करणाऱ्या लोकांचेही अच्छे दिन असणार आहे. त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. मात्र या दिवसांमध्ये कामाचा ताण वाढणार आहे. गरज पडल्यास थोडी विश्रांती नक्की घ्या. 


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी संन्यासी योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक आनंदायी घटना घडणार आहेत. समाजात मान सन्मान वाढणार आहे. नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. आरोग्यही सुधारणार आहे. 



धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांना संन्यासी योगाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदारी वाढणार आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. अचानक आर्थिक फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ असणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं तुम्हाला मिळणार आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी 'या' 6 राशींचं राजासारख आयुष्य!



( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )