Saraswati Puja 2024 : माघ शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी (Vasant Panchami) साजरी करण्यात येते. यावर्षी वसंत पंचमी सण व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजेच 14 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस माता सरस्वतीच्या जयंती म्हणून साजरी करण्यात येते. माता सरस्वतीची मूर्ती तुम्ही कधी नीट निरखून पाहिली आहे का? सरस्वती माता नेहमी पांढऱ्या वस्त्रात, कमळावर विराजमान सोबत हंस आणि एका हातात वीणा, दुसऱ्या हातात पुस्तक आणि एका हातात स्फटिक माळ असते. या सर्व वस्तूचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? (Saraswati puja 2024 Know Significance of Items Hold by Maa Saraswati or Basant Panchami in Marathi)
डॉ. जया मदन यांनी वसंत पंचमीनिमित्त (Vasant Panchami 2024) एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात तिने सांगितलं आहे की, माता सरस्वतीच्या संबंध हा गुरु देवाशी आहे. जया हिने माता सरस्वतीच्या हातातील वस्तूचं महत्त्व सांगितलं आहे. 
 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांढरे वस्त्र - पांढरा रंग हा शांतता, सौंदर्य आणि साधेपणाचे प्रतीक मानला गेलं आहे. 


हंस - माता सरस्वतीचं वाहन मोर आहे. असं म्हणतात हंसामध्ये दूध आणि पाणी वेगळे करण्याची शक्ती असते. हे चिन्ह आपल्याला योग्य आणि चुकीच्या दरम्यान फरक आपल्याला शिकवतो. 


कमळ - माता सरस्वतीला कमळावर विराजमान असून तिला ते फुल खूप प्रिय आहे. कमळ चिखलात जन्माला येते पण ते निष्कलंक असतं. कठीण परिस्थितीतही कमळ आपलं अस्तित्व जपतो. 


वीणा - मातेच्या हातात वीणा आहे जी आपल्याला कलेची जाणीव करुन देते. 


क्रिस्टल हार - स्फटिक माळ ही एकाग्रता आणि ध्यानाचे प्रतीक मानलं जातं. 


पुस्तक - माता शारदा ही विद्येची देवाता आहे. ज्ञानाशिवाय जीवनात काहीच नाही, असा संदेश ती देत असते. 


वसंत पंचमी सरस्वती पूजा मुहूर्त 2024


वसंत पंचमी सरस्वती पूजेचा मुहूर्त 14 फेब्रुवारीच्या सकाळी 7:01 ते दुपारी 12:35 पर्यंत असेल. तर वसंत पंचमी तिथी 13 फेब्रुवारीला दुपारी 2:41 ते 14 फेब्रुवारीला दुपारी 12:09 पर्यंत असणार आहे. 



वसंत पंचमीला 'या' गोष्टी नका करा!


वसंत पंचमीला सरस्वती मातेला तांदळाची खीर केसर घालून करावी. तांदूळ हे चंद्र आणि केसर हे गुरुला समर्पित असल्याने या गजकेसरी योगामध्ये तांदळाची खीर केली जाते. या नैवेद्याचं ग्रहण करुन इतरांना वाटल्यास तुमच्या आयुष्यात आनंद आणि विद्या वाढते. या दिवशी धार्मिक पुस्तक, विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप करावं. त्याशिवाय घरात कागदाचा अपव्यय करु नये. वर्षांतून शक्य तेव्हा पुस्तकाचं दान करावं. त्याशिवाय या दिवशी पिवळ्या मिठाईचं दान करावं. तसंच पूजा करताना या दिवशी पिवळ्या वस्त्र परिधान करावं. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)