Sarva Pitru Amavasya 2022: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठरावीक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांचं बारा राशीत त्यांच्या कालावधीनुसार भ्रमण होत असतं. आता 25 सप्टेंबरला सर्वपित्री अमावास्या आहे. या दिवशी चंद्र सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. या दिवशी लक्ष्मी नारायण योग आणि बुद्धादित्य योग देखील तयार होत आहेत. कन्या राशीमध्ये 4 ग्रह एकत्र येत असल्याने विशेष योगायोग घडत आहे. ग्रहांच्या युतीमुळे 3 राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद राहील. चला जाणून घेऊयात 3 राशी कोणत्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: या राशीच्या लोकांना नोकरीच्या नवीन ऑफर मिळू शकतात. व्यवसाय आणि करिअरमध्ये येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल. नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. पितरांचा आणि ग्रहांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आरोग्य साथ देईल आणि कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.


सिंह: या राशीच्या लोकांसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल असणार आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्यासाठी योग वेळ आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. पदोन्नती किंवा वेतनवाढ देखील होऊ शकते. वाणीवर संयम ठेवा, जीवनात आनंद मिळू शकतो.


वृषभ: सर्वपित्री अमावास्याला चार ग्रह एकत्र येणार आहे. सूर्य, बुध, शुक्र आणि चंद्र या ग्रहांची युती असणार आहे. या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणाच्या बाजूने तुम्ही निश्चिंत असाल आणि सकारात्मक बातम्या ऐकू येतील. कला क्षेत्राशी निगडित लोकांना जीवनात अनेक यश मिळू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)