Sarva Pitru Amavasya 2024 : 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजच्छाया योग! `या` उपायाने संकटातून मिळेल आराम आणि बँक बॅलेन्सही वाढणार
Solar Eclipse 2024 : तब्बल 9 वर्षांनंतर सर्वपित्री अमावस्येला गजछाया योग असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा अतिशय सउब योग मानला जातो. आर्थिक लाभासाठी काही उपाय सांगण्यात आलंय.
Sarva Pitru Amavasya 2024 Remedies : हिंदू धर्मानुसार सर्वपित्री अमावस्या ही पितरांना समर्पित आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीनुसार वेळोवेळी अनेक योग तयार होत असतात. काही योग अतिशय लाभदायक असतात तर काही योग हे घातक असतात. यंदा सर्वपित्री अमावस्येला तब्बल 9 वर्षांनी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा योग निर्माण होणार आहे. भाद्रपद अमावस्या किंवा सर्वपित्री अमावस्येला यंदा गजच्छाय योग जुळून आला आहे. (Sarva Pitru Amavasya 2024 Remedies for money gajchhaya yoga astrology in marathi)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गजच्छाया योगामध्ये पितरांसाठी केलेल्या कोणत्याही कार्याचं अनेक पटींनी फळ मिळतं. पितृ विसर्जन अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी, त्यांचे पिंड दान, गंगास्नान, हवन यज्ञ इत्यादी केल्याने अनेक पटींनी फल प्राप्त होते. ज्यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या जगात परततील आणि आपल्या वंशजांवर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करतील.
सर्वपित्री अमावस्या तिथी!
सर्वपित्री अमावस्या 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 वाजता आणि 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता असेल. या अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या म्हणतात. उदय तिथीनुसार अमावस्या 2 ऑक्टोबरलाच असणार आहे. जर तुम्ही सतत आर्थिक समस्यांशी झगडत असाल तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास फायदा होईल, वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तिळाचा लाडू बनवून मंदिरात अर्पण करावा. तसंच हे लाडू कावळे, गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छाही लक्षात ठेवा. असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वादही मिळेल.
ईशान्य दिशेला दिवा लावा!
वास्तुशास्त्रानुसार उत्तर-पूर्व दिशा पवित्र मानली जाते. हे देवतांचे निवासस्थान मानले जाते. या काळात पितरांची पूजा आणि स्मरण करावे आणि घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेने दिवा लावावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. घरात पैसा येतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते.
आर्थिक भार कमी करण्यासाठी उपाय!
सर्वपित्री अमावस्येचा अर्थ म्हणजे पितरांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे. या दिवशी पूजा आणि दानाचे फळ आपल्याला मिळते. यावेळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी 21 वेळा तुळशी माळेचा जप करावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)