Saturn Transit 2023 to 2026 Predictions: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानण्यात आलंय. त्याच्या प्रत्येक हालचालीचा जवळपास सर्व राशींच्या व्यक्तींवर मोठा प्रभाव पडताना दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेव सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहेत. म्हणजेच ते उल्टी चाल चालतायत. मात्र येत्या 4 नोव्हेंबरपासून ते पुन्हा सरळ चालण्यास सुरुवात करणार आहे. याचाच अर्थ शनी मार्गस्थ होणार आहेत. याचा सर्व 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र यावेळी अशा 4 राशी आहेत ज्यांच्या आयुष्यात यामुळे सकारात्मक बदल होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


वृषभ रास


4 नोव्हेंबरपासून वृषभ राशीच्या लोकांसाठी काळ अतिशय शुभ ठरणार आहे. या काळात शनिदेवाच्या कृपेने नोकरीत प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिका-यांचे सकारात्मक सहकार्य मिळेल. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो.


मिथुन रास


शनी मार्गस्थ झाल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी मिळणार आहे. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. जमीन आणि वाहन खरेदीचे योग येतील. भागीदारीची कामं करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल राहील. धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.


सिंह रास


सिंह राशीच्या लोकांनाही शनिदेव प्रत्यक्ष असल्यामुळे विशेष लाभ होणार आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. या काळात व्यावसायिकांनाही चांगली बातमी मिळेल. व्यवसायात मोठा करार होईल. या काळात तुम्हाला व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकाल. जमिनीशी संबंधित कामातून लाभ होईल.


कन्या रास


शनिदेव प्रत्यक्ष असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. यावेळी शनिदेव नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करून देणार आहेत. आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत. जीवनात निर्माण होणाऱ्या समस्याही हळूहळू संपुष्टात येतील. व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)