मुंबई : नशिबाशी संबंधित अनेक रहस्यं हाताच्या रेषांमध्ये दडलेली आहेत. तळहातावर असलेल्या विविध रेषा आणि खुणा शुभ आणि अशुभ संकेत देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चिन्हाबद्दल सांगणार आहोत ज्याला हस्तरेषाशास्त्रात 'शनि वलय' असं म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनि वलयचा अर्थ काय आहे, तळहातावर हे वलय कुठे तयार होतं आणि त्याचे काय परिणाम होतात. याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.


हाताच्या मधल्या बोटाच्या अगदी खाली अर्धवर्तुळाकार मार्गाने शनि पर्वताला वळसा घालणाऱ्या रेषेला 'शनि वलय' म्हणतात. सामान्यतः हस्तरेषाशास्त्रात शनि वलय अशुभ मानलं जातं. ज्या लोकांच्या हातात ही शनि वलय असतं, ते सुख आणि आनंदी जीवनापासून वंचित राहतात. 


ज्या लोकांच्या तळहातावर शनि वलय असतं, त्यांना जीवनात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अडचणी, आव्हानं आणि निराशा अशा लोकांना कधीच सोडत नाही. अशा लोकांचं भाषण त्यांच्या शैलीशी कधीच जुळत नाही. हे लोक खूप बोलतात आणि खूप कमी काम करतात. हातावर शनि वलय असलेली शॉर्ट हेड रेषा असेल तर अशा लोकांना एकटं राहणं आवडतं.


  • तळहातावर शनि वलयाची एक अतिशय स्पष्ट आणि खोल रेषा सूचित करते की, व्यक्ती बुद्धिमान आहे. असे लोक खूप शांत राहतात आणि त्यांची गुपितं कोणाशीही शेअर करत नाहीत. हे लोक मित्र आणि नातेवाईकांपासूनही दूर राहतात. 

  • तळहातावर शनि वलय स्पष्ट किंवा स्पष्ट नसेल तर असे लोक कमकुवत आणि निंदक मानले जातात. या लोकांना एकटं राहणं आवडतं म्हणून ते लग्न करणं टाळतात. या लोकांना आत्महत्या आणि गुन्हेगारीपासून देखील दूर राहणं आवडतं.

  • तळहातावर शनि वलयाची रेषा तुटलेली असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. त्या व्यक्तीला अडचणींचा सामनाही करावा लागत नाही.

  • जर शनि वलय अर्धवर्तुळाऐवजी काट्यासारखी असेल किंवा हेड लाइन असलेला अंगठा कमकुवत असेल तर ते अशुभ चिन्ह आहे. हे लोक जीवनातील मोठ्या यशापासून वंचित राहतात.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)