Shani Retrograde 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनि हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो. यासोबतच शनिदेव एका राशीत सर्वाधिक काळ राहतो. अशा स्थितीत शनीच्या स्थितीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच शनि स्वतःच्या कुंभ राशीत आहे. 2024 मध्ये तो या राशीत राहणार आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये शनि वक्री स्थितीत जाणार आहे. कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांना शनि वक्री झाल्यामुळे विशेष लाभ मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. यासोबतच करिअरमध्ये प्रगती होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे अचानक आर्थिक लाभ होईल. तुम्हाला चांगला नफा मिळेल आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. 


सिंह रास (Singh Zodiac)


शनीच्या वक्री स्थितीमुळे सिंह राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासोबतच भरघोस यश मिळू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. करिअरच्या क्षेत्राबद्दल बोलल्यास तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन वर्षात तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील.


तूळ रास (Tula Zodiac)


तूळ राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे विशेष लाभही मिळू शकतो. पुढच्या वर्षी जूननंतर, तुम्हाला प्रमोशनसह वेतनवाढ मिळू शकते. करिअरमध्ये येणाऱ्या अनेक समस्या संपुष्टात येऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )