Shani Nakshatra Parivartan 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरलेल्या वेळानंतर आपली स्थिती बदलतो. 9 ग्रहांमधील शनिदेव हा सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. कर्मदाता आणि न्यायदेवता जेव्हा आपली चाल बदलतो याचा परिणाम मानवी जीवनावर थेट पडतो. शनिदेव गेल्या वर्षी आपल्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान असून तो वेळोवळी नक्षत्र बदल करत असतो. 12 मे 2024 रोजी सकाळी 8:08 वाजता शनि पूर्वाभाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश करणार आहे. याचा परिणाम काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. 12 राशींपैकी 3 राशींच्या आयुष्यात शनिदेवाच्या नक्षत्र बदलामुळे वादळ येणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या. (Saturn will make these people cry a lot Shani Nakshatra change bad period for 3 signs)


वृषभ रास (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या लोकांवर शनिदेवाची वक्र दृष्टी पडणार आहे. 12 मे पासून 18 ऑगस्टपर्यंत कोणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ती पाण्यात बुडतील. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद निर्माण होणार आहे. कुटुंबात काही मुद्द्यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. 


तूळ रास (Libra Zodiac)  


शनिदेवाची नक्षत्र परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी वाईट ठरणार आहे. विद्यार्थ्यांना हा काळ खराब असणार आहे. या लोकांनी या काळात वागात अजिबात पडू नका, अन्यथा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे. कोणतंही कामं पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे. नोकरदार लोकांनी आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणं हिताच ठरेल अन्यथा वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


कुंभ राशीच्या व्यक्तीवर शनिदेवाचा कहर बरसणार आहे. ज्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तीने सावध राहणे गरजेच आहे. या काळात दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैशाची हानी होणार आहे. अनोळखी व्यक्तींवर अजिबात विश्वास ठेवू नका. तुमच्या जोडीदाराशी काही कारणावरून वाद होण्याची शक्यता आहे. घरगुती कलह वाढणार आहेत. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)