Sawan Pradosh Vrat 2023 : आज श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार असून त्यासोबत आज सोम प्रदोष व्रतदेखील आहे.  या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार आज श्रावण शुक्ल पक्षातील द्वादशी आणि त्रयोदशी दोन्ही तिथीदेखील आहे. यासोबतच 4 शुभ संयोग आयुष्मान योग, सवार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि रवियोग देखील आहे. या काळात भोलेनाथाची पूजा करणे फलदायी मानली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार आजचा दिवस 5 राशींसाठी खूप शुभ राहील. भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद या राशींवर बरसणार आहे. (sawan somvar 2023 sawans som pradosh vrat  28 August Horoscope 5 lucky zodiac signs)


सिंह (Leo)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांवर भोलेनाथची विशेष कृपा बरसणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळणार आहे. हा काळ गुंतवणुकीसाठी फलदायी आहे. 


 मेष (Aries)


या राशीच्या लोकांचाही श्रावण सोम प्रदोष व्रताचा दिवस अतिशय शुभ ठरणार आहे. शत्रूंवर मात करण्यात यशस्वी होणार आहात. आर्थिक समस्यांपासून तुमची सुटका होणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा वाढणार आहे. संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं सहकार्य लाभणार आहे. बढतीची शक्यता आहे. 


धनु (Sagittarius)


या राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. नोकरी आणि करिअरमध्ये फायदा होणार आहे. कुटुंबात समृद्धीत वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांना पैसा मिळवण्याच्या नवीन संधी चालून येणार आहे. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस फलदायी ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवन गोडवा असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 28 ऑगस्ट - 3 सप्टेंबर : 'या' राशींना धनलाभाचे योग! जाणून घ्या कशी असेल तुमच्या खिशाची स्थिती?


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)