Rajyog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यावेळी डिसेंबर महिन्यात अनेक ग्रहांच्या हालचालीत बदल होत आहेत. ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार वृश्चिक राशीमध्ये बुध आणि शुक्राचा संयोग होऊन लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. यासोबतच शुक्र केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण करतोय. गुरु आणि शुक्र यांच्यात समतुल्य दृष्टी संबंध निर्माण होत झाल्याने समसप्तक राजयोग तयार होतोय. यासोबतच शुक्राचा शुभ संयोग गुरूवर होत असून काम योगही तयार होणार आहे.


‘काम राजयोग’ हा सर्व इच्छा पूर्ण करणारा योग मानला जातो. यासोबतच शुक्र मालव्य राजयोग निर्माण करतोय. याशिवाय धनशक्ती योग आणि महाधन राजयोगही तयार होणार आहे. असा योगायोग अनेक शतकांनंतर घडतोय. डिसेंबर महिन्याच्या शेवटी असा शुभ योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप पैसा मिळू शकणार आहे. जाणून घेऊया 7 राजयोगांचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळू शकणार आहे.


मकर रास (Makar Zodiac)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष आनंदाचे असू शकणार आहे. कर्जमुक्तीबरोबरच आर्थिक स्थितीही मजबूत होईल. या राशीच्या लोकांच्या जीवनावर शनि आणि राहूचाही सकारात्मक प्रभाव पडणार आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकणार आहे. कौटुंबिक काळातील मतभेद संपुष्टात येऊ शकतात. अविवाहित लोकांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.


कन्या रास (Kanya Zodiac)


नशीबाच्या दृष्टीकोनातून नवीन वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी खूप चांगले असू शकते. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. येणार्‍या काळात शनि तुम्हाला फक्त सुखच देणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीमुळे यश मिळू शकते. अनेक प्रकारच्या आजारांपासून आराम मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून सुटका मिळेल.


वृश्चिक रास (Vraschik Zodiac)


वृश्चिक राशीसाठी डिसेंबर ते नवीन वर्ष खूप शुभ असणार आहे. या राशीत बुध आणि शुक्राचा संयोग होणार आहे. वर्षाच्या शेवटी होणाऱ्या या संयोगामुळे राजयोगाचे अनेक प्रकारही तयार होणार आहे. यासोबतच मंगळ एक मनोरंजक राजयोगही तयार करतोय. चढत्या अवस्थेत हा राजयोग तयार केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. बुध व शुक्र यांच्या युतीने निर्माण होणारा लक्ष्मी नारायण योग संपत्तीसह सुख-समृद्धी प्राप्त करेल. क्रीडा, संरक्षण इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )