मुंबई : शनिदेवाला न्यायाची देवता म्हणतात. माणसाचे पाप आणि पुण्य पाहून त्यानुसार फळ देतात. असं म्हणतात की एकदा शनिदेवाचा कोप झाला की सर्व काही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. अशा स्थितीत सर्व लोक आपली कर्मे सुधारण्यासाठी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमच्याकडेही शनिदोष, साडेसाती असेल तर शनिश्चरी अमावस्येला विशेष उपाय करून तुम्ही या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.


पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं शुभ


सनातन धर्माच्या अभ्यासकांच्या मते, ज्या महिन्यात अमावस्या शनिवारी येते, त्याला शनि अमावस्या म्हणतात. यावेळी भाद्रपद महिन्यातील शनिश्चरी अमावस्या आहे. असं मानलं जातं की, या दिवशी दान केल्याने आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते.


या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं. चला जाणून घेऊया ही वेळ शनिश्चरी अमावस्या कधी आहे आणि या दिवशी कोणते विशेष उपाय केले जाऊ शकतात.


27 ऑगस्ट रोजी शनिश्चरी अमावस्या होणार आहे


सर्वप्रथम, यावेळी भाद्रपद अमावस्या 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.23 पासून सुरू होतेय. ही शनिश्चरी अमावस्या 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1.46 वाजता समाप्त होईल. यावेळी शनिश्चरी अमावस्येलाही शिवयोग तयार होतोय. 27 ऑगस्टच्या सकाळपासून दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्ट रोजी पहाटे 02:07 पर्यंत हा योग राहील.


शनिश्चरी अमावस्येला हे उपाय करा


शनिदेव मंदिराला भेट द्या


शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून शनि मंदिरात जाऊन शनिदेवाचं दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या. तुम्ही मंदिरात बसून शनि चालीसेचा पाठ करा. असं केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात असं मानलं जातं.


मोहरीच्या तेलाने शनिदेवाला अभिषेक 


यावेळी भाद्रपद अमावस्येला शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा. यानंतर त्यांना अगरबत्ती, धूप, काळं तीळ आणि गंध यांसारख्या वस्तू अर्पण करा. हे उपाय केल्याने शनिदेव भक्तांवर खूप कृपा करतात.


शनि रक्षा स्तोत्राचं पठण 


शनिदेवाची नाराजी दूर करण्यासाठी शनिश्चरी अमावस्येला शनि रक्षा स्तोत्राचं पठण करावं. अयोध्येचा राजा दशरथ याने स्वत: त्याची रचना केल्याचं मानलं जातं. असं म्हणतात, या स्रोताचं पठण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सर्व संकटांपासून वाचवतात.