Shani Budh Grah: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सात ग्रह वक्री अवस्थेत जातात. सध्या बुध, शनि आणि गुरू वक्री अवस्थेत आहेत. पण ऑक्टोबर महिन्यात बुध आणि शनि मार्गस्थ होणार आहेत. शनि आणि बुध ग्रह मार्गस्थ होणार असल्याने 4 राशींना फायदा होईल. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 2 ऑक्टोबर 2022, तर शनि ग्रह 23 ऑक्टोबर 2022 रोजी मार्गस्थ होणार आहे. गोचर स्थितीचा कोणत्या राशींना लाभ मिळेल जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: शनि आणि बुध मार्गी होताच मेष राशीच्या लोकांना खूप लाभ मिळेल. व्यवसायात मोठा करार निश्चित होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांनाही फायदा होईल. बढती आणि वेतनवाढ मिळू शकते. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते.


वृषभ: वृषभ राशीच्या लोकांना शनि आणि बुध मार्गक्रमणामुळे लाभ मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. करिअरमध्ये उच्च पद मिळविण्याचे स्वप्न पूर्ण होईल. उत्पन्न वाढेल. समस्या दूर होतील. समाजात मान-सन्मान मिळेल.


मिथुन: बुध आणि शनीच्या मार्गस्थ होणार असल्याने मिथुन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. आर्थिक लाभाच्या अनेक संधी समोर येतील. परीक्षा-मुलाखतीत विद्यार्थ्यांना फायदा होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आता वक्री शनिमुळे होणाऱ्या त्रासातून सुटका मिळेल.


ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत सूर्यग्रहण आणि ग्रहांचा विचित्र योग, या 6 राशींना होणार यातना!


धनु: बुध आणि शनि मार्गस्थ होत असल्याने धनु राशीच्या लोकांना लाभ देईल. विशेषत: दिवाळीचा काळ खूप फायदेशीर ठरेल. उत्पन्न वाढेल.  व्यवसायात नफा वाढेल.  काम करणाऱ्यांचा पगारही वाढू शकतो.


(Disclaimer: वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)