Vish Yog 2023 Effect : ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून हा म्हणजे जुलै महिना महत्त्वाचा आहे. जुलैच्या पहिलाच आठवड्यात अनेक ग्रह आपली स्थित बदलणार आहे. 9 ग्रहांपैकी चंद्र हा सर्वात जलद गतीने आपली स्थिती बदल असतो. तर शनि सर्वात हळूवारपणे एका घरातून दुसऱ्या घरात प्रवेश करतो. शनिदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत अडीच वर्षांसाठी विराजमान आहे. लवकरच कुंभ राशीत चंद्र ग्रह (Shani Chandra Yuti 2023) प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनी आणि चंद्राचा योगामुळे सर्वात घातक असा विषयोग तयार होत आहे. (shani chandra making vish yog in kumbh rashi 3 zodiac signs Bad Effect)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 6 जुलै गुरुवारी चंद्र हा मकर राशीतून कुंभ राशीत दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी संक्रमण करणार आहे. चंद्र कुंभ राशीत  8 जुलैला मीन राशीत पारी 2 वाजून 57 मिनिटांनी स्थलांतर करणार आहे. याचा अर्थ कुंभ राशीत शनी आणि चंद्राच्या युतीने सव्वा दोन दिवसांचा विषयोग तयार होतो आहे. या विषयोगाचा सर्वाधिक खतरा तीन राशींच्या लोकांना असणार आहे. 


'या' राशींवर होणार विषयोगाचा घातक परिणाम 


कर्क (Cancer)


शनि आणि चंद्राच्या युतीमुळे अशुभ विषयोगामुळे कर्क राशीच्या लोकांवर सकंट कोसळणार आहे. कुंडलीत या राशीच्या आठव्या घरात शनी विराजमान आहे. या काळात तुम्हाला अनेक कितीही मेहनत केलं तरी फळं मिळणार नाही. आरोग्याची समस्या जाणवणार आहे. या दिवसांमध्ये कुठलीही गुंतवणूक करु नका. अन्यथा मोठ्या आर्थिक फटका बसू शकतो. वाहन अपघाताची शक्यता असल्याने प्रवास आणि वाहन चालवणे टाळा. 


कन्या (Virgo)


शनी आणि चंद्र भेटीमुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. विनाकारण घरात आणि कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये शांत आणि संयम बाळगा. कोर्टकचेरीचं प्रकरण तुमच्या मागे लागू शकतं. अनावश्यक खर्च होऊ शकतो. 


मीन (Pisces)


शनी आणि चंद्र यांच्या युतीमुळे विषयोगाचा मीन राशीच्या लोकांवर वाईट परिणाम होणार आहे. या लोकांना बोलण्यावर खूप संयम बाळगावे लागणार आहे. अन्यथा यांना अनेक वादाला सामोरे जावे लागेल. या काळात तुमच्या आजूबाजूला चोरीची घटना घडू शकते. जर कुठले शुभ कार्य करण्याचा विचारात असाल तर सव्वा दोन दिवस थांबा. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या अन्यथा मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)