Shani Dosh Vehicle  Astrology : शनिदेवाची कर्म फलदायी असल्याचे सांगितले जाते. शनि देव माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. कोणालाही त्यांच्या क्रोधाचा बळी होण्याची इच्छा नसते. त्यासाठी लोक अनेक पूजा आणि उपाय करताना दिसतात. शनि देव आणि लोखंडाचा संबंध असतो असे मानले जाते. अशा परिस्थितीत जे लोक वाहन चालवतात किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गाडीच्या ट्रंकमध्ये काही वस्तू ठेवल्याने शनि देवाच्या नाराजीचा बळी व्हावे लागू शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना वेळेत गाडीतून बाहेर काढा. (Astrology) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोखंडापासून बनवलेल्या वस्तू शनिदेवाशी संबंधित मानल्या जातात. अशा परिस्थितीत वाहनधारकांनी काही गोष्टींची काळजी घ्यावी, अन्यथा त्यांना शनिदोषाला सामोरे जावे लागू शकते. दुचाकी असो की चारचाकी असो, अनेक वेळा लोक अनावश्यक वस्तू त्यांच्या वाहनाच्या ट्रंकमध्ये टाकतात. ज्योतिष शास्त्रानुसार वाहनाच्या ट्रंकमध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्याने समस्या उद्भवू शकतात.


हेही वाचा : 'मौत मुबारक हो...', Meena Kumari यांच्या निधनानंतर नर्गिस दत्त यांनी का दिल्या अशा विचित्र शुभेच्छा


ज्योतिष शास्त्रानुसार खूप मेंटेनन्स करूनही तुमची गाडी पुन्हा पुन्हा खराब होत असते. भरपूर पैसे गुंतवले तरी नेहमीच अडचण येते. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होत आहे, त्यामुळे यामागील कारण शनि दोष असू शकतो. अशा स्थितीत त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.


निरुपयोगी बाटल्या, जुनी बिलं, पेपर गाडीत ठेवू नयेत. यामुळे शनिदेवाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो आणि मानवी जीवनावर नकारात्मक परिणाम सुरू होतात. वाहनाची डिक्की नेहमी स्वच्छ ठेवावी. दरम्यान, टूल्स आणि स्टेपनी डिक्कीत ठेवू शकतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)