Shani Shash Yoga: नवग्रहांमध्ये शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. जातकांना कुंडलीत आले की चांगल्या वाईट गोष्टींचं हिशोब करतात. शनिदेव साडेसाती, अडीचकी, महादशा आणि अंतर्दशा या माध्यमातून जातकाच्या कुंडलीत येतात. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहे. कुंभ ही शनिदेवांची स्वराशी आहे. दुसरीकडे गोचर कुंडलीत शनिदेवांची स्थिती लाभदायी ठरते. राजयोगामुळे रंकाचा राजा होतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिच्या राजयोगाला शश योग संबोधलं जातं. हा योग लग्न किंवा चंद्र कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानात शनिदेव उच्च रास मकर, कुंभ किंवा तूळ राशीत विराजमान झाल्यावर होतो. या राजयोगामुळे अडचणी कमी होतात. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होते. व्यक्तीवर अडीचकी आणि साडेसातीचा प्रभाव तितका पडत नाही. 


राशीचक्रातील या राशींना होणार फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- ज्योतिषशास्त्रानुसार सध्या राहु ग्रह मेष राशीत विराजमान आहे. त्यानंतर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये गुरु ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे शनिदेव मेष राशीच्या अकराव्या स्थानात गोचर करणार आहे. या स्थितीमुळे या राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. नोकरी आणि व्यवसायात उन्नती होईल. 


वृषभ- जानेवारीत शनिदेव मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. म्हणजेच वृषभ राशीच्या दहाव्या स्थानात गोचर करणार आहे. या स्थितीमुळे जातकांना फायदा होईल. शनिदेव या राशीच्या नवम आणि दशम भावाचे स्वामी आहेत. यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. 


धनु- शनिदेव या राशीच्या तिसऱ्या स्थानात गोचर करणार आहेत. विशेष म्हणजे शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करणार असल्याने साडेसाती देखील संपणार आहे. यामुळे या व्यक्तीला गुंतवणुकीतून लाभ मिळेल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. 


बातमी वाचा- नववर्ष 2023 मध्ये गजलक्ष्मी योगामुळे तीन राशींना होणार फायदा, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा


कुंभ- ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कुंभ राशीच्या प्रवेश करणार आहे. ही शनिची स्वरास आहे. यामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. आजारी असलेल्या लोकांना या काळात औषधांचा गुण दिसून येईल. भागीदारीच्या कामातून लाभ मिळू शकतो. तसेच जोडीदाराकडून पूर्ण साथ मिळेल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)