Guru Rashi Parivartan 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी बदल करतो. सध्या गुरु ग्रह मीन राशीत असून पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीला जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर आर्थिक अडचण असल्यास दिलासा मिळतो. गुरु ग्रह 21 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजून 43 मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष ही मंगळाची स्वामित्व असलेली रास आहे. गुरुच्या या गोचरामुळे गजलक्ष्मी योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग सर्वात शुभ योग गणला जातो. या गोचराचा तीन राशींना फायदा होणार आहे.
मेष- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी गुरूचे गोचर फायदेशीर ठरणार आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. करिअरमध्ये यशाची नवीन शिखरे गाठाल. व्यवसायापासून नोकरीत यश मिळेल. या काळात उत्पन्नात वाढ होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक लाभामुळे तुमच्या जीवनात अनेक बदल होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
धनु- धनु राशीसाठी गुरु गोचर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात प्रचंड नफा मिळवण्यात यश मिळेल. प्रेमप्रकरणातील दुरावा दूर होईल. लव्ह लाईफ चांगली राहील. या काळात अचानक लाभ होईल. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये उच्च स्थान प्राप्त करतील. तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे.
बातमी वाचा- ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवांना किती वेळा अर्घ्य द्यावा? जाणून घ्या नियम
मिथुन- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना गुरु गोचराचा खूप लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कमाईचे नवीन मार्ग मिळतील. तुमची जुनी गुंतवणूक या काळात चांगला नफा मिळवू शकते. त्याच वेळी, नोकरदार लोकांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)