Saturn Transit July 2022: शनि गोचर म्हटलं की भलभल्यांना घाम फुटतो. शनिदेव आपल्या राशीाल नको अशी जवळपास प्रत्येकाची भावना असते. शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून गणलं जातं. शनिदेवांचा गोचर हा मंदगतीने होतो. शनिदेव अडीत वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे ज्या राशीत प्रवेश केला आहे. त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. गोचरादरम्यान शनिदेव वक्रीही होतात. वक्री झाल्यानंतर काही कालावधीसाठी मागच्या राशीत जातात. त्यामुळे साडेसाती आणि अडीचकीची गणितं बदलतात.  
शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्री अवस्थेत आहेत. 12 जुलै रोजी, शनि ग्रह त्यांच्या स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेव सहा महिने मकर राशीत राहतील. मकर राशीतील वक्री शनिचे संक्रमण काही लोकांसाठी वरदान ठरेल. मकर राशीत शनिच्या वास्तव्यादरम्यान त्यांना खूप फायदा होईल. करिअर-आर्थिक स्थितीत प्रचंड फायदा होईल. जाणून घ्या कोणत्या तीन राशींसाठी शनिचे संक्रमण चांगले दिवस घेऊन येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ: शनिचे संक्रमण या राशीसाठी शुभ असेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल.  सध्याच्या नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. एकूणच, करिअरमध्ये प्रगती होणे निश्चितच आहे. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. धनलाभ होईल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक चिंता कमी होईल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. अविवाहित लोकांना जोडीदार मिळू शकतो.


धनु : वक्री शनिचा मकर राशीत प्रवेश धनु राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. त्याचबरोबर साडेसातीपासून तात्पुरता दिलासा मिळेल. सहा महिन्यांसाठी चांगली फळं मिळतील. अचानक पैसे किंवा उत्पन्न वाढेल. नोकरी आणि बिझनेस या दोन्हीसाठी हा काळ चांगला आहे. व्यावसायिकांना फायदा होईल आणि नोकरी शोधणाऱ्यांची प्रगती होईल. भागीदारीत काम करणाऱ्यांसाठी आणि भागीदारीत काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे.


मीन: वक्री शनि गोचर मीन राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. उत्पन्न वाढेल. सहा महिन्यांत लाभाच्या अनेक संधी मिळतील. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग तयार होतील. व्यावसायिक या काळात चांगले करार निश्चित करू शकतात. दुसरीकडे, नोकरी शोधणाऱ्यांना  करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर मिळण्याचीही जोरदार शक्यता आहे. जुन्या वादात विजय मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)